प्रारूप प्रभाग रचना व प्रभाग दर्शक नकाशावर हरकती व सूचना आमंत्रित

✒️पंकज रामटके(विशेष प्रतिनिधी)

🔸१० ते १४ मे २०२२ पर्यंत हरकती व सूचना

🔹२३ मे रोजी आक्षेप व हरकतीवर सुनावणी

चंद्रपूर(दि.9मे):- जिल्ह्यातील घुग्घुस, बल्लारपूर, वरोरा, चिमूर, मूल, राजुरा व नागभीड या नगरपरिषदांच्या व भिसी नगरपंचायतीच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचनेच्या प्रस्तावास दि. ७ मार्च २०२२ रोजी मान्यता दिलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशास अनुसरून राज्य निवडणूक आयोगाच्या दि. १० मार्च २०२२ रोजी सुरू असलेल्या टप्प्यांपासून निवडणुकांची कार्यवाही त्वरित सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.

त्याअनुषंगाने आयोगाने दि. ६ मे २०२२ रोजी सुधारित प्रारूप प्रभाग रचना कार्यक्रम-२०२२ जाहीर केल्यानुसार उपरोक्त नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील प्रारूप प्रभाग रचना व प्रभागदर्शक नकाशावर हरकती व सूचना मंगळवार दि. १० मे ते शनिवार दि. १४ मे २०२२ पर्यंत संबंधित नगरपरिषद, नगरपंचायत कार्यालयात मागविण्यात येत आहे.

दि. १० मार्च २०२२ पासून प्रारूप प्रभाग रचनेवर प्राप्त झालेल्या आक्षेप व हरकतीसह सुधारित कार्यक्रमानुसार नव्याने प्राप्त होणाऱ्या आक्षेप व हरकतीवर सुनावणी जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे सोमवार दि. २३ मे २०२२ पर्यंत घेण्यात येईल. असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कळविले आहे.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, विदर्भ, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED