राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन- जनकल्याण फाउंडेशन चा पुढाकार

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.9मे):-:-महात्मा ज्योतिराव फुले व राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने राज्यस्तरीय ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा जनकल्याण फाउंडेशन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते पियुष रेवतकर यांच्या नेतृत्वात घेण्यात येणार आहे. त्या प्रश्न मंजुषा स्पर्धेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशासाठी योगदान, महात्मा फुले यांचे साहित्य, शाहू महाराजांचा इतिहास ,सामाजिक कार्य व स्त्री शिक्षण चळवळ, भारतीय संविधान, इतर महापुरुष व सामान्य-ज्ञान विषयावर प्रश्न असतील. या स्पर्धेमध्ये राज्यस्तरीय तीन बक्षिसे ठेवण्यात आली आहे.

प्रथम बक्षीस 2000 रु व पुस्तकांचा संच, द्वितीय बक्षीस 1000 रु व पुस्तकांचा संच, तृतीय बक्षीस 500 रु व पुस्तकांचा संच असून प्रत्येक सहभागी स्पर्धकास ई- सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये स्पर्धकांना ६० मिनीट मध्ये १०० सोडविणे गरजेचे आहे. 11 मे ला ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी 8767022075 या नंबरवर संपर्क साधावा व स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

बीड, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED