चिंचोली (बु.)दरबारात ‘मदर डे ‘व इ-मिलन कार्यक्रम साजरा

87

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि.10मे ):- ब्रह्मपुरी तालुक्यातील चिंचोली(बूज.)येथे सय्यद मो. ईकबालशाह बाबा ऊर्फ बाबाजान कादरी चिशती चिंचोली(बु) दरबारात दि.08 मे 2022 रोजी ‘मदर डे’ व इ-मिलन कार्यक्रमानिमित्य सजादा नशीन मो. शरीफ कादरी (अम्मासाहेब )यांना सर्व दरबारी सेवकांनी दर्शन घेऊन साष्टांग दंडवत घालून आशीर्वाद घेतले.सय्यद मो.इकबालशाह बाबा उर्फ बाबाजान चिशतीच्या वतीने सर्व भाविक दरबारी योग्य प्रकारे मार्गदर्शन केले व भोजनदान करून मोठ्या उत्साहात कार्यक्रम साजरा करण्यात आला.त्याचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक केले.

यावेळी मोहम्मद शफी कुरेशी सर,अब्दुल शरीफ शेख,हाजीर शफी अहमद चंद्रपूर , प्रल्हाद धोटे सर, तुषार सोम,वसंता गोंगाल, गुलाब चौधरी,आदिल अब्दुल कादर कुरेशी, इटनकर सर,सुमित दिवटे,आशिष सोंडवले, ब्रह्मपुरी तालुका पत्रकार संघाचे सचिव तथा देशोन्नती पत्रकार गोवर्धन दोनाडकर ब्रह्मपुरी,आशु सांगोडे,संजू रणदिवे, विनोद मुसंनी व अन्य मान्यवर उपस्थित होते.