पैसे घेऊन पोलीस दबेल, जुनासुर्लात दारूचा खेळ

26

✒️मूल(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मूल(दि.11मे):- महाराष्ट्र शासनाने चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केली त्यामुळे अवैध धंद्यातून अनेकांची चांदी झाली . त्याला पाठबळ कोणत्या विभागाचे होते , हे न समजण्याइतके नागरिक दुधखुळे नाहीत .

याचा कळस म्हणजे आजघडीला शासनाने दारूबंदी उठवलेली असून सरकारमान्य परवानाधारकांपेक्षा पोलिसांच्या संगनमताने गलोगल्ली अवैध दारूविक्रेते माजल्याचे चित्र दिसत आहे .

याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून जुनासुर्ला येथील परिस्थिती आणि पोलीस प्रशासनाची भूमिका याला जगात तोड नसेल . जुनासुर्ला येथे पदोपदी दारूविक्रेते भेटतील याचे श्रेय पोलीस प्रशासनाला द्यावे लागेल यात कोणातही दुमत नाही .