रिपब्लिकन पक्षाच्या बागलाण तालुक्याच्या वतीने तहसीलदार बागलाण यांना विविध मागण्यांचे निवेदन

108

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.11मे):- रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री मा. ना.रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार व जिल्हाप्रमुख मा. प्रकाशजी लोंढे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बागलाण चे नायब तहसीलदार मा.श्री. नेरकर साहेब व पुरवठा अधिकारी मा. श्री.विजय खरे यांना राज्यातील विविध प्रश्न – अनुसूचित जाती, जमाती,इतर मागास व अन्य मागास जातीच्या विविध विकासात्मक मागण्यांचे निवेदन रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सरचिटणीस श्री.किशोरदादा सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष श्री.बापुराज खरे,तालुका अध्यक्ष श्री.बापू मोरे,सटाणा शहराध्यक्ष श्री.भारत बच्छाव व महिला आघाडी प्रमुख श्रीमंती बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालय सटाणा येथे देण्यात आले.

संपूर्ण राज्यात आज रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आज सर्व तहसीलदार कार्यालयात देण्यात आलेल्या विविध मागण्यात 1) राज्यातील सर्व अनु.जाति, जमाती प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना पदोन्नती मध्ये आरक्षण मिळणे बाबत.
2) 2019 च्या निवडणुकीत मतदान केलेल्यांच्या घरांना व झोपड्यांना कायदेशीर मान्यता मिळणे बाबत.
3) राज्यातील सर्व भूमिहीनांना पाच एकर पर्यंत जमीन कसण्यासाठी मिळावी.

4) 1990 च्या कट ऑफ डेट मध्ये वाढ करून 2000पर्यंत च्या गायरान जमिनीवरील मागासवर्गीयांचे अतिक्रमण कायदेशीर करण्यात यावे.
5) आदिवासींनी पूर्वीपासून अतिक्रमित केलेल्या जमिनी त्यांच्या नावावर होणे बाबत.
या वरील सर्व मागण्या शासनाने मान्य कराव्यात यासाठी हे निवेदन देण्यात आले.

तहसीलदार कार्यालय बागलाण येथे निवेदन देतांना प्रसंगी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सरचिटणीस श्री.किशोर दादा सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष – बापुराज खरे ,तालुकाध्यक्ष श्री.बापू मोरे,सटाणा शहराध्यक्ष श्री.भारत बच्छाव,तालुका महिला आघाडी प्रमुख श्रीमती अरुणा बच्छाव,जिल्हा नेते श्री.रघुनाथ जगताप,तालुका सरचिटणीस श्री.रमेश व्यापार,युवक नेते,ईश्वर सरदार,स्वप्नील बच्छाव, पक्षाचे कार्यकर्ते श्री.दत्तात्रेय खरे,कारभारी अहिरे,दिगंबर गरुड,हिरामण ढळवले, सुरेश मोरे,सतीश खैरनार, तसेच अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.