२३ व्या सामूहिक विवाह सोहळ्यासाठी शारदा प्रतिष्ठान सज्ज

79

🔹वधुवरांची नोंदणी करुन लाभ घ्या—-अमरसिंह पंडित

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

गेवराई(दि.१२मे):-शारदा प्रतिष्ठानच्या वतीने शनिवार दिनांक १४ मे रोजी २३व्या सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असुन या विवाह सोहळ्यासाठी शारदा प्रतिष्ठान सज्ज झाले आहे. ईच्छुक पालकांनी आपल्या उपवर मुलामुलीच्या विवाहासाठी वधुवरांची नोंदणी करुन या सामुहिक विवाह सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे कार्यवाह अमरसिंह पंडित यांनी केले आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात अमरसिंह पंडित पुढे म्हणाले की गेल्या बावीस वर्षांपासून सातत्याने शारदा प्रतिष्ठान सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करते. मात्र कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत दोन वर्ष विवाह सोहळा खंडित झाला. या संकटानंतर शारदा प्रतिष्ठानने मोठ्या थाटात २३ व्या सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. या विवाह सोहळ्यात सहभागी होणा-या वधुवरांना शासकिय मदत मिळणार आहे. प्रतिष्ठानच्या वतीने वधुवरांना मणिमंगळसुत्र, कपडे, बुट चप्पल, संसार उपयोगी साहित्य दिले जाणार आहे.

शारदा प्रतिष्ठानचा हा सामुहिक विवाह सोहळा येत्या शनिवार दि. १४ मे २०२२ रोजी सायंकाळी ६:३५ वाजता गढी येथील भवानी मंदिर परिसरात संत, महंत व इतर प्रमुख पदाधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे. या सामूहिक विवाह सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली असून विविध समित्या विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. गेवराई येथील जगदंबा आय.टी.आय. येथे विवाह नोंदणी कार्यालय सुरु करण्यात आले असून वधुवर नावनोंदणी सुरु आहे. ईच्छुक पालकांनी आपल्या उपवर मुलामुलीच्या विवाहासाठी आवश्यक कागदपत्रासह वधुवरांची नोंदणी करावी असेहीे अमरसिंह पंडित यांनी शेवटी म्हटले आहे.