आमदार देवेंद्र भुयार यांच्या पुढाकाराने ५ वर्षाच्या चिमुकल्यावर मुंबई येथे मोफत शस्त्रक्रिया !

🔹मायवाडी येथील भावेश सोनवणेला मिळाला दिलासा !

🔸२ लक्ष रुपयांची मोफत शस्त्रक्रिया !

✒️मोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मोर्शी(दि.12मे):-विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार हे मोर्शी विधानसभा मतदार संघामध्ये रुग्णसेवेकरिता नाविन्यपूर्ण उपक्रम राबवतांना दिसून येतात. ते सातत्याने रुग्णसेवेचे काम करण्यात अग्रेसर असतात. त्यांच्याकडे आरोग्याचा विषय घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला ते नेहमी सहकार्य करतांना दिसत आहे.
मोर्शी तालुक्यातील मायवाडी येथील भावेश विशाल सोनवणे या ५ वर्षाच्या चिमुकला लहानपणापासू हृदयाचा त्रस्त असलेल्या चिमुकल्यावर आमदार देवेंद्र भुयार यांच्या रुग्णसेवेमुळे तात्काळ वैद्यकीय सुविधा मिळाल्याने एस आर सी सी हॉस्पिटल हाजी अली मुंबई येथे यशस्वी हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली या मोफत शस्त्रक्रियेने या चिमुकल्याला नवे आयुष्य मिळाले .

५ वर्षाच्या भावेश सोनवनेला हृदयाचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याकरिता २ लक्ष रुपयांचा खर्च होणार असल्यामुळे सोनोने कुटुंबीयांनी आमदार देवेंद्र भुयार यांच्याशी संपर्क केला असता आमदार देवेंद्र भुयार यांनी चिमुकल्या भावेशच्या तब्बेतीची दखल घेऊन क्षणाचाही विलंब न करता तात्काळ मुंबई येथील एस आर सी सी हॉस्पिटल हाजी अली मुंबई येथे ऍडमिट करून २ लक्ष रुपयांची हृदयाची मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली.

आमदार देवेंद्र भुयार यांच्या माध्यमातून मायवाडी येथील भावेश सोनवणेला मुंबई येथील नामांकित रुग्णालयात दाखल करून सर्व उपचार मोफत उपलब्ध करून देण्यात आले. आता भावेश पूर्ण ठणठणीत बरा होऊन सोनवणे कुटुंबाला दिलासा मिळाला. आमदार देवेंद्र भुयार यांच्या या जागरूक पणामुळे फार मोठा आरोग्याचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे सोनवणे परिवाराने आमदार देवेंद्र भुयार, रुग्णसेवक पंकज ठाकरे, राधेश्याम पैठणकर यांचे आभार मानले.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED