विस्तार अधिकारी पदोन्नती प्रक्रिया लवकरच : सीईओ मॅडमचे पुरोगामीला आश्वासन

34

🔸उन्हाची दाहकता लक्षात घेता धरणे आंदोलन तूर्तास स्थगित

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.12मे):-महाराष्ट्र राज्य पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्या निकाली काढण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी यांना निवेदन देऊन संघटनात्मक भेट घेण्यात आली. उच्च श्रेणी मुख्याध्यापकाची व विस्तार अधिकारी (शिक्षण) रिक्त पदे पदोन्नतीने भरण्यात यावी. डीसीपीएस च्या मार्च २०२१ पर्यंतच्या कपातीचा हिशोब तात्काळ मिळण्यात यावा , निवडश्रेणी व वरिष्ठश्रेणी प्रस्ताव मंजूर करणे. उष्णतेची तीव्रता लक्षात घेऊन उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत शिक्षकांना उपक्रमाची सक्ती करू नये, अधिसंख्य शिक्षकांची समस्या व इतर अनेक वैयक्तिक प्रकरण निकाली काढण्याबाबत माननीय सीइओ मिताली सेठी यांनी सकारात्मक चर्चा घडवून आणली.

नंतर दिपेंद्र लोखंडे शिक्षणाधिकारी प्राथमिक व मान. मातकर मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी गेले असता त्यांची भेट झाली नाही .मान.दिपक जेऊरकर वरिष्ठ लेखाधिकारी व मा.स्वाती कुलकर्णी सहा.लेखाधिकारी यांचेशी वरोरा येथील अशोक राऊत व इतरांचे एप्रिल २०१७ ते जुन २०१७ चे जीपीएफ हप्ते जमा न झाल्यासंबंधाने चर्चा करण्यात आली. नितीन बमनवार यांची डीसीपीएस ची रक्कम जी.पी.एफ ला वळती करण्यासंदर्भात चर्चा केली असता शासनाकडून मार्गदर्शक सुचना व निधी आल्यानंतर जीपीएफ ला रक्कम जमा करण्याची कारवाई करण्यात येईल असे सांगितले. राज्यनेते विजय भोगेकर , राज्यसरचिटणीस हरीश ससनकर, जिल्हानेते नारायण कांबळे , सल्लागार दीपक वऱ्हेकर, जिल्हाध्यक्ष किशोर आनंदवार , सरचिटणीस संजय चिडे , कोष्याध्यक्ष सुनील कोहपरे , कार्याध्यक्ष गंगाधर बोढे , कार्यालयीन सचिव सुरेश गिलोरकर , जिल्हा उपाध्यक्ष लोमेश येलमुले , राज्यसचिव निखिल तांबोळी ,चंद्रपूर तालुका सरचिटणीस मनोज बेले यांनी मांडलेल्या समस्या ऐकून घेत सर्व समस्या निकाली काढत लवकरच रिक्त विस्तार अधिकारी पदे पदोन्नतीने भरण्याचे ठाम आश्वासन सीइओ मिताली सेठी यांनी संघटनेला दिले .

सीईओ मॅडमशी घडून आलेल्या सकारात्मक चर्चेत संघटनेने उन्हाची दाहकता लक्षात घेऊन नियोजित धरणे आंदोलन तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला असून समस्या निकाली न निघाल्यास संघटना आपल्या आंदोलनात्मक भूमिकेवर ठाम राहून आक्रमक धोरण स्वीकारेल अशी माहिती जिल्हा प्रसिद्धीप्रमुख लक्ष्मण खोब्रागडे यांनी दिली आहे .