शैक्षणिक अर्हता वाढीच्या मंजुरीचे अधिकार गटविकास अधिकारी यांना प्रदान करा : पुरोगामी शिक्षक समितीची मागणी

42

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.13मे):-चंद्रपूर जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षकांचे शैक्षणिक अर्हता वाढीच्या मंजुरीचे अधिकार शिक्षणाधिकारी(प्राथमिक)जिल्हा परिषद चंद्रपूर यांचेकडे प्रदान केलेले आहे. आजमितीस अनेक शिक्षकांनी शैक्षणिक अर्हता वाढीच्या मंजुरी -साठी शिक्षण विभाग जि.प.चंद्रपूर येथे प्रस्ताव सादर करतात. परंतू ब-याच अवधीपासून शैक्षणिक अर्हता वाढीचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. काहींचे प्रस्ताव गहाळ झाल्याचे शिक्षकांत चर्चा आहे.अधिकाराचे विकेंद्रीकरण करुन प्रकरणे प्रलंबित राहू नये यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ,गडचिरोली यांनी आदेश क्रमांक /साप्रवि/स्था2/1416/2015 दिनांक 07/01/2015 नुसार संबंधित पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना शिक्षकांचे शैक्षणिक अर्हता वाढीच्या प्रस्तावास मंजुरी देण्याचे अधिकार प्रदान केल्याने 10 – 15 दिवसांत संबंधित शिक्षकांना विहीत कालावधीत मंजुरी आदेश प्राप्त् होत आहेत.

मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी मराठी/हिंदी सुट मंजुरीचे अधिकार पंचायत समिती स्तरावर गटविकास अधिकारी यांना प्रदान केले असल्याने सदरचे प्रकरणे तात्काळ मंजुर होवून तशी नोंद मुळ सेवापुस्तकात घेणे सोईचे व सुलभ झालेले आहे. अगदी त्याच धर्तीवर शैक्षणिक अर्हता वाढीच्या प्रकरणास मंजुरी प्रदान करण्याचे अधिकार गटविकास अधिकारी पंचायत समिती सर्व यांना प्रदान केल्यास प्रलंबित असणारे प्रकरणे तात्काळ मंजुर होण्यास सहायभुत ठरेल .शैक्षणिक अर्हता वाढीच्या मंजुरीचे अधिकार पंचायत समिती स्तरावर दिल्यास संबंधित पंचायत समितीत कार्यरत असलेल्या शिक्षकांना त्रुटीची पुर्तता करण्यास व त्यासंबंधाने चौकशी करण्यास अडचण निर्माण होणार नाही. सुलभ व सोईची प्रक्रिया होण्यासाठी व शिक्षकांना लवकर न्याय मिळणेसाठी तसेच विहीत कालावधीत शैक्षणिक अर्हता वाढीच्या मंजुरीचे आदेश संबंधित शिक्षकांना मिळण्यास मदत होईल अशी पुरोगामी शिक्षक समितीची धारणा आहे.

करिता उपरोक्त् विषयाचे अनुषंगाने कार्यवाही करावी अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ,चंद्रपूर यांचेकडे पुरोगामी शिक्षक समितीचे राज्यनेते विजय भोगेकर, राज्य सरचिटणीस हरीश ससनकर, राज्य सचिव निखील तांबोळी, महिला राज्याध्यक्ष अल्का ठाकरे,जिल्हा सल्लागार दिपक व-हेकर, जिल्हानेता नारायण कांबळे,जिल्हाध्यक्ष किशोर आनंदवार,जिल्हासरचिटणीस संजय चिडे, जिल्हा कार्याध्यक्ष गंगाधर बोढे, जिल्हा कोषाध्यक्ष सुनिल कोहपरे, कार्यालयीन सचिव सुरेश गिलोरकर जिल्हा उपाध्यक्ष मोरेश्वर बोंडे,रवि सोयाम,सुधाकर कन्नाके,लोमेश येलमुले, सहसचिव दुष्यंत मत्ते,प्रमुख संघटक नरेश बोरीकर, महिला मंच जिल्हानेता सुनिता इटनकर,महिला मंचाच्या अध्यक्ष विद्या खटी, सरचिटणीस पौर्णिमा मेहरकुरे, कार्याध्यक्ष सिंधु गोवर्धन, कोषाध्यक्ष लता मडावी, उपाध्यक्ष पुनम सोरते, सुलक्षणा क्षिरसागर, , प्रमुख संघटक ज्ञानदेवी वानखेडे यांनी केलेली आहे असे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख लक्ष्म्ण खोब्रागडे एका पत्रकान्वये कळविले आहे.