युवा पत्रकार नवनाथ आडे यांचा १५ मे रोजी अभिष्टचिंतन सोहळा

🔸नवनाथ आडे म्हणजे पत्रकारितेच्या माध्यमातून न्याय देणारा निर्भीड पत्रकार…..!

✒️पुरोगामी न्युज नेटवर्क

गेवराई(दि.13मे):- कुठल्याही क्षेत्रात काम करा पण प्रामाणिकपणे करा तुमच्या चांगल्या कामाची लोक दखल घेत असतात.अगदी याच प्रमाणे पत्रकारिता क्षेत्रात काम करत असताना युवा पत्रकार नवनाथ आडे यांनी सर्व सामान्य माणसांना न्याय देण्याचे प्रमाणिक काम आपल्या लेखणीच्या माध्यमातून करत आहेत. पत्रकारिता करतं असताना सामाजिक,धार्मिक, शैक्षणिक, कार्यात देखील ते अग्रेसर आहेत. दि.१५ मे रोजी त्यांचा वाढदिवस आहे.

शेतकरी,कष्टकरी, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न ते आपल्या लेखणीच्या माध्यमातून सातत्याने मांडत असतात. समाजात वावरताना अनेक चांगल्या, वाईट प्रसंगाचा धीराने सामना करावा लागतो. नातेसंबंध, मित्र परिवार, यांचे हितसंबंध जोपासावे लागतात. याचा विचार करणारे, समाजाप्रती आपण काही देणे लागतो याची जाणीव ठेवून काम करणारे दैनिक गोदावरी क्रांती चे व पुरोगामी संदेश चे पत्रकार आहेत दोन्ही वृत्तपत्राचे बीड जिल्हा प्रतिनिधी या पदावर नवनाथ आडे कार्यरत आहेत, तसेच एक सर्वसमावेशक व्यक्तिमत्व आहेत, आणि ते दिव्यांग देखील आहेत, दिव्यांग असून त्यांची तळमळ, जिद्द, खूप मोठी आहे.

त्यांचे शिक्षण चालू असताना ते चॅनेल व न्युज पेपर चे काम चालवून एक सामाजिक सेवा सुरू करून आपली जबाबदारी पार पाडत असताना देशाचा चौथा आधारस्तंभ असलेल्या प्रसार माध्यमांच्या मदतीने सामाजिक अडीअडचणीवर भाष्य करून, पत्रकारिता च्या माध्यमातून आवाज उठवून प्रशासनाला जाग आणण्याचे काम करत आहेत, समाजासाठी एक आदर्शवत काम होण्यासाठी प्रयत्नशील राहणारे, सुपरिचित, सर्वसमावेशक व्यक्तिमत्व असणारे प्रचंड जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास यांच्या जोरावर एक संवेदनशील व सर्जनशील बनलेले नव्या युगातील पत्रकार ज्यांच्या शुन्यातून सुरू झालेला प्रवास थक्क करणारा असून अत्यंत अल्पावधीतच ज्यांनी आपल्या पत्रकारितेचा वेगळा ठसा उमटविणारे तसेच ३ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करणारे असे निर्भीड पत्रकार कोमलवाडी गावचे भुमिपूत्र युवा नवनाथ आडे यांना पुरोगामी संदेश टिम कडून वाढदिवसाच्या दीर्घायुषी शुभेच्छा….

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED