आरमोरी तालुक्यात वाघाची दहशत, आरमोरी-डंपिंग यार्ड सरहद्द मध्ये एक शेतकरी वाघाचा बळी

49

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

आरमोरी(दि.14 मे):-आज सकाळी अंदाजे 7:30 वाजता च्या दरम्यान मौजा आरमोरी येथील हद्दीत नंदू गोपाळा मेश्राम रा. जुना तलाठी कार्यालय अरमोरी जवळ, वय 50 वर्ष या पुरुषाला वाघाने ठार केले. मृतक अल्पभूधारक शेतकरी नंदुजी हे आपल्या स्वताच्या शेतावर धानपिकाची देखभाल करण्यासाठी सकाळी 7:00 वाजताच्या सुमारास गेले असतां बांधाआड दडून बसलेल्या वाघाने नंदूजी वर हल्ला चढवून दोन बांधाआड ओढत नेत ठार केले.

काही वेळाने घटनास्थळी नागरिकांची मोठया प्रमाणात गर्दी उसळली होती सलग दोन दिवस आरमोरी तालुक्यात अगदी आरमोरी सभोवताल वाघांच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना घडल्या असून सर्वत्र भीतीचे वातारण पसरले आहे.वन विभाग कडून आता पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले आहे. मृतकाच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळले आहे. वाघाच्या दहशतीमुळे तालुक्यातील सर्व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे