उपासकांनी एकाच वेळी दोन धर्माचे पालन केल्यामुळे भारतातून बौद्ध धर्म नष्ट झाला!

30

परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वाली सिंह यांना 16 /2/ 1955 रोजी लिहिलेले पत्र.पत्राचा मजकूर खालील प्रमाणे आहे.
उपासकाचे धर्मांतर हे मुळात धर्मांतरच नाही.ते नाममात्र आहे. फक्त नाव आहे. ज्याला आपण बौद्ध उपासक म्हणतो,तो बुद्धाची पुजा करता करता अन्य धर्माच्याही देव देवतांची पूजा करू लागला,की ज्या देवदेवता बौद्ध धम्माचा पाडाव करण्यासाठी ब्राह्मणांनी निर्माण करून बौध्दांकडे पाठवल्या…..भारतातील बौद्ध धर्म मोठ्या प्रमाणात नष्ट झाला कारण तो एकाच वेळी दोन धर्माचे पालन व पुजा करू लागला. उपासकाच्या एकाच वेळी दोन धर्माचे पालन करण्याच्या प्रवृत्तीमुळे बौद्ध धम्म व भारतातून नष्ट झाला.

यानंतर मात्र जर भारतात बौद्ध धम्माची पक्की प्रस्थापना करायची असेल तर उपासकांनी सर्वस्वी,पूर्णत्वाने बौद्ध धम्माशी पक्के बांधून ठेवले पाहिजे.कट्टरतेने धम्माचे पालन केले पाहिजे.ह्या गोष्टी पूर्वी कधी झालेल्या नाहीत. कारण बौद्ध धम्मा मध्ये संघाची दीक्षा होती पण उपासकाची धम्मदीक्षा नव्हती.ख्रिश्चन धर्मामध्ये धर्म प्रवेशासाठी दोन प्रकारचे संस्कार विधी होते. 1)-धर्म प्रवेश करणे म्हणजे बापटीझम .2)-ऑर्डीनेशन – विधी करण्यासाठी दीक्षा .येथे सांगितल्याप्रमाणे भारतामध्ये धम्म प्रचारासाठी बौद्ध धम्माची नवीन धम्म चळवळ, ख्रिश्चन धर्माप्रमाणे बौद्ध धम्मा मध्ये अंगीकारली पाहिजे. ही वाईट व खतरनाक गोष्ट काढून टाकण्यासाठी मी एक फार्मूला तयार केलेला आहे. ज्याला मी धम्मदीक्षा म्हणतो.. प्रत्येक माणूस ज्याला बौद्ध होण्याची इच्छा आहे, त्याला विधिवत बौद्ध धम्म दीक्षा समारंभपूर्वक घ्यावी लागेल. अन्यथा त्याला बौद्ध म्हणता येणार नाही.

संदर्भ
1)- चांगदेव खैरमोडे खंड बारा पहिली आवृत्ती जुलै 1992 पान नंबर 24- 25
2)- डॉ.बाबासाहेब आंबेडकर रायटींग एन्ड स्पीचेस व्ह्लुम सतरा खंड एक पान नंबर 430

✒️भंते शाक्यपुत्र राहुल(9834050603)आम्रपाली बुद्ध विहार मजलापुर (दापूरा) ता.जि अकोला