सामाजिक विचारावर खरे उतरणारे समाज योध्दे प्रमोददादा सुर्यवंशी

72

महात्मा ज्योतिबा फुले सामाजिक जाणिव पुरस्कारासाठी प्रमोद सूर्यवंशी यांची निवड. विश्वकर्मा प्रतिष्ठान पुणे सिंहगड रोड यांच्या वतीने यंदाचा महात्मा ज्योतिबा फुले सामाजिक जाणिव पुरस्कार, सर्वसामान्य बेघर ज्येष्ठ कार्यकर्ते प्रमोदजी सुर्यवंशी यांना जाहीर करण्यात आला आहे.कधी ही कार्यकर्ता पैशात मोजु नये.गरीब प्रामाणिक पणे समाजात खिशात पैसे नसतांना वैचारिक प्रबोधन करून समाजात जनजागृती करणाऱ्या कार्यकर्त्याला पत्रकार,लेखकांना कमी लेखू नये.असे विष्णू गरुड संस्थापक विश्वकर्मा प्रतिष्ठान पुणे यांनी प्रमोद सूर्यवंशी यांची निवड करतांना सांगितले.

प्रमोदजी सुर्यवंशी हे ओबीसी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आर्थिक विषयावर विविध वृत्तपत्रात नियमितपणे लिहत असतात.तसेच फुले शाहू आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन ओबीसी समाजात वैचारीक जनजागृती करणारे प्रेरणादायी, अभ्यासपूर्ण लिखाण करुन प्रबोधनाची चळवळ समाजात रुजवत असतात. तसेच समाजातील गरजूंना स्वताच्या कुवतीनुसार आर्थिक मदत ही करत असतात. उच्चशिक्षण घेऊन सुशिक्षित सुरक्षित नोकरी करणाऱ्यांची समाजाबद्दलची मानसिकता बदलावी म्हणून त्यांना वैचारिक ज्ञान देणारे पुस्तके मोफत वाटप करतात,असा दानशूर कार्यकर्ता लेखकाचा सत्कार प्रसिद्ध कसोटी क्रिकेटपटू धीरज जाधव यांच्या हस्ते व साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष साहित्यिक श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम १५ मे २०२२ एस.एम.जोशी फाऊंडेशन नवी पेठ, पुणे येथे संपन्न होणार आहे. महात्मा फुले पगडी, सन्मान चिन्ह, “लेक वाचवा राष्ट्र वाचवा” विष्णू गरुड लिखित संहिता असे पुरस्काराचे स्वरुप आहे.महात्मा ज्योतिबा फुले सामाजिक जाणिव पुरस्कार या पुर्वीचे पुरस्काराचे मानकरी पुणे विद्यापीठाच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठ नामविस्तार कार्यात अग्रेसर असलेले,तसेच लेखक, फुले, शाहु, आंबेडकर चळवळीत सक्रिय सहभाग घेणारे डॉ. प्राध्यापक गौतम बेंगाळे, आरोग्य सेनेचे संस्थापक अभिजित वैद्य यांना दिलेला आहे.

यावर्षी ओबीसी समाजात वैचारिक जनजागृती करणारे विविध वृत्तपत्रात नियमितपणे स्तंभ लेखन करणारे मान.प्रमोदजी सूर्यवंशी यांना देण्यात येणार आहे.ही बातमी वाचल्या नंतर शिक्षणाच्या पदव्या घेऊन सुशिक्षित सुरक्षित नोकऱ्या करणारा जे करू शकत नाही ते काम एक भंगारचा धंदा करणारे ओबीसी सुतार समाजाचे जागरूक कार्यकर्ते, ओबीसी जनजागृती साठी सतत वैचारिक पोस्ट लिहणारे आणि विविध वृत्तपत्रात नियमितपणे लेख लिहणारे प्रसिद्ध स्तंभ लेखक प्रमोद सूर्यवंशी यांचावर काही तरी लिहले पाहिजे असे मला वाटले.म्हणून मी ओबीसी वारीयर्स मिशन १,मार्शल सुतार,असा चार पांच ग्रुपवर प्रमोद सूर्यवंशी यांना कोणी दादा,काका म्हणतात हे त्यांच्या पोस्ट वरील प्रतिकीर्या वाचून समजले.त्यांचे संकलन केले.त्यातील अनिल सोमवंशी यांचे शब्दांकन असे आहे.

स्थळ वेरुळ कार्यक्रम विश्वकर्मा समाजाची भव्य मांदीयाळी.समाजनेता,समाज धुरंधर नागोराव पांचाळ यांना ऐकण्यासाठी ऐतिहासिक गर्दी.या कार्यक्रमासाठी अनेक समाज चळवळीची लोकही आली होती.अशातच मार्शल सुतार ग्रुपव्दारे समाजात समाज चळवळीचा सर्वोत्तम पुरस्कार देण्यासाठीची तयारी.समाज बांधव संजयराव दिक्षित यांच्या पुढाकाराने सदर कार्यक्रम घडणार होता.तत्पूर्वी कार्यक्रमाच्या आदल्या रात्री मार्शल-ग्रुप व्दारे “समतेचे मानदंड” ह्या प्रतिमा समाजबांधवांना भेट देण्यात आल्या.त्याव्दारे समाज बांधवांत समाज विचार,सामाजिक विचार चळवळ, भारतीय संविधान,बहुजन संत व महापुरुष याविषयी विचार पेरणी व संस्प्रेरणा निर्माण हेतू प्रयत्न करणे होय.अशाच चर्चेतून बुलढाणावासी दोन व्यक्ती आम्हाला भेटल्या.एक प्रमोदादा सुर्यवंशी व दुसरे गजानन जवरकर काका.चर्चा करता करता, आम्हाला जाणवले की,परखडपणा,स्पष्ट बोलणे व सडेतोड वागणे यामुळे प्रमोददादा समाज चळवळीसाठी योग्य व्यक्ती वाटले.मग त्यांना “समतेचे मानदंड” प्रतिमा देऊन त्यांना आदरांकीत करण्यात आली.अन् काय आश्चर्य. यानंतर समाजात होणा-या समाज आंदोलन, ओबीसी आंदोलन यात सहभाग नोंदवून प्रमोददादांनी समाजविघातक गोष्टींना जाहीर विरोध करण्यासाठी जाहीर भूमिका घेतली. यानंतर ते समाजातील सामाजिक वैचारिक विचारांना पाठिंबा देण्यासाठी तन-मन-धनाने नेहमी सहकार्य व सतत मदत करुन याव्दारे समाजात प्रचंड लोकप्रिय झाले. यानंतर अनेक ठिकाणी प्रवास व समाज लोक संपर्कामुळे समाज दुःख जवळून पाहिले.यामुळे समाज समस्या मांडण्यासाठी सोशल मिडियावर लिखाणाचे हत्यार उपसून अवैध प्रवृत्तीला जोरदार विरोध केला.

आपल्या लेखणीने समाजातील अनेक दृश्य-अदृश्य समस्या मांडून समाजाला शिक्षित करण्याचा सततच्या प्रयत्नाने बहुजन चळवळीतील अनेक लोकांना प्रमोददादांचे आकर्षण झाले. समाजातील उपेक्षित- वंचित- उपेक्षित- गरीब घटकांचा आवाज म्हणून प्रमोददादा आता ओळखले जाऊ लागले.सोशल मिडियाचा वापर फक्त मनोरंजन म्हणून न करता समाजोध्दारा करीता कसा वापरला पाहिजे याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रमोद दादा सुर्यवंशी होय.‌‌ सोशल मिडिया “मार्शल-सुतार” ग्रुपवर लिहिता लिहिता प्रमोददादा यांचे विचार आता महाराष्ट्रातील अनेक वर्तमानपत्रांत प्रसिद्ध होत आहे.समाज चळवळीतील अनेक नवीन-जुन्या लोकांसाठी आदर्श समाजसंहिता सुर्यवंशी यांनी तयार केली.यामुळे समाजाला समाजविकासक गोष्टी “सत्ता-संपत्ती-ज्ञान” याकडे जाण्यास निश्चितच संस्प्रेरणा मिळेल.असे शब्दांकन- अनिल सोमवंशी यांनी केले आहे.तसेच त्यांनी अनुमान काढले – पहिले मदतहंस व नंतर प्रश्नहंस बनून समाजात समाज विचाराचा सतत जागर करुन समाजविकासक गोष्टींबद्दल समाजाला जागृत करण्याचे ध्येय व उद्देश यामुळे समाजात अल्पावधीत लोकमानसात मानाचे स्थान प्रमोद सुर्यवंशी यांना आज मिळालेय. असा निष्कर्ष- समाजाविषयी प्रचंड तळमळ व पोडतिडक असणारे प्रमोदजी सुर्यवंशी यांचे ओबीसी-बहुजन चळवळीतील लोकांनी विशेष कौतुक केलेय.‌‌हे वाचत असतांनाच स्वताला मान्यताप्राप्त ओबीसी सुतार समाजाचे विश्वकर्मा ब्राम्हण समजणारे नेते प्रमोद सूर्यवंशीच्या वैचारिक लिखाणाचे गोड कौतुक करण्या ऐवजी त्यांना जयभिम वाल्याच्या नादी लागून बिगडला, त्यांच्या पोस्ट वाचून त्यांच्या नादी लागू नका असे सांगितल्या व बोलतात. दुसरे त्याला कामधंदा नाही,स्वताचे घरदार नाही आणि ओबीसीचा नेता बनायला निघाला असे अपमानास्पद शब्द काही कार्यकर्ते,नेते वापरतात असे मला अनेकांच्या पोस्ट मधून वाचायला मिळाले.फुले शाहू आंबेडकरांच्या क्रांतिकारी विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणारे प्रमोद दादा पण काही कच्चा गुरुचे चेले शिष्य नाहीत, ते ही त्यांना सडेतोड आणि रोखठोक उत्तरे देऊन गप्पगार करतात. असे हे प्रमोद सूर्यवंशी माझ्या चार पाच वर्ष पूर्वी संपर्कात आले .दैनिक देशोन्नती मधील लेख वाचून त्यांनी मला संपर्क केला. मी अकोल्या वरून बुलढाणा येथे कामगार मेळाव्याला जात असतांना चिखलीच्या खामगाव फाट्यावर मला भेटण्यासाठी तीन तास वाट पाहत थांबले.दहा मिनिटे भेट देऊन जा अशी विनंती केली.त्या भेटी नंतर त्यांनी आज पर्यंत नियमितपणे संपर्क ठेवला आहे. अनेक वृत्तपत्रातील वैचारिक लेख वाचून ते लेखकांना हार्दिक शुभेच्छा देऊन अभिनंदन करतात. आणि संपर्कात राहतात.

ओबीसी समाजात जनजागृती करण्याकरिता वैचारिक प्रबोधन करणारे लिखाण ते नियमितपणे करतात.अशा तळमळीच्या धडपडणाऱ्या कार्यकर्त्यांची महात्मा ज्योतिबा फुले सामाजिक जाणिव पुरस्कारासाठी निवड.विश्वकर्मा प्रतिष्ठान सिंहगड रोड पुणे यांचे संस्थापक विष्णू गरुड यांनी निवड केली.त्याबद्दल त्यांचे ही हार्दिक अभिनंदन केले पाहिजे.कारण त्यांनी निवड करतांना जे निकष लावले तेच कौतुकास्पद आहेत.कधी ही कार्यकर्ता पैशात मोजु नये.गरीब प्रामाणिक पणे समाजात खिशात पैसे नसतांना वैचारिक प्रबोधन करून जनजागृती करणाऱ्या कार्यकर्त्याला पत्रकार,लेखकांना समाजाने कमी लेखू नये.असे त्यांनी निवड करतांना सांगितले आहे.म्हणूनच सामाजिक विचारावर खरे उतरणारे समाज योध्दे प्रमोददादा सुर्यवंशी.यांचा ओबीसी समाजात गुणगौरव झालाच पाहिजे.असे कार्यकर्ते जगले तरच संघटना वाढतात.अनेक ओबीसी स्वताला ब्राम्हणाचे जवळचे समजून मनुवादी विचारांच्या संस्था,संघटना,पक्षात वाहून घेतल्यामुळे ओबीसी समाजाचे न भरून येणारे नुकसान होत आहे.आजची त्यांची सत्य परिस्थिती एकना धड भारा भर चिंद्या झाली आहे.हे ५२ टक्के ओबीसी समाजाने लक्षात ठेवली पाहिजे.

✒️सागर रामभाऊ तायडे(भांडूप मुंबई)मो:-९९२०४०३८५९