ऊस उत्पादक शेतकरी आत्महत्या प्रकरणी सहकार मंत्री यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

28

🔹रयत शेतकरी संघटनेची मागणी

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

गेवराई(दि.14मे):- तालुक्यातील हिंगणगाव येथील ऊस उत्पादक शेतकऱ्याने ऊस पेटवून शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कारण कारखान्याने त्याचा दोन एकर ऊस नेला नसल्याचे. ऊसाचा हा एकमेव बळी नाही. तर राज्यातील लाखो कामगार या उसाचे बळी आहेत. सध्या राज्यातील अनेक साखर कारखान्याने उसाचे गाळप बंद केल्यामुळे शेतकऱ्याच्या शिल्लक उसाचे करायचे काय? असा हा गंभीर प्रश्न. याला जबाबदार कोण आहे? असा ओरोप रयत शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुनिल ठोसर यांनी केला आहे.राज्यातील एकही नेत्याकडे महाराष्ट्राच्या विकासाचे धोरण नाही, हे महाराष्ट्रातील ज्वलंत समस्यांवरून लक्षात येते. ऊसतोड कामगारांची सतत दुर्लक्ष किंबहुना फसवणूक केली आहे हे लक्षात घेणे आवश्यक. ही फसवणूक ऊसतोड कामगारांचे जीव घेणारी आणि साखरकार कारखानदारांना तारणारी आहे.

गेवराई तालुक्यातील घटना ही दुदैवी आहे. परंतु अशा संकटात काही दलाल नेते स्वतः ची राजकीय दुकानदारी करताना दिसतात आहेत व अशा दलाल नेत्यांना दुदैवी घडल्याचे काही भान आहे का नाही? खरंत अशा नेत्यांना शेतकऱ्यांनी जोड्याने मारायला पाहिजे नसता रयत शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुनिल ठोसर हे जोड्याहित रूमने घेऊन पार्श्वभाग ठोकल्याशिवाय राहाणार नाही असा खंबीर ईशारा सुनिल ठोसर यांनी दिला आहे

माहितीस्तव..
गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथील एका ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखाना ऊस तोडून नेत नसल्याने दि, ११ मे रोजी ऊस पेटवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे, तरी त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना १० लाखाची मदत मिळावी व सहकार मंत्र्यांवर मनुष्यवाधाचा गुन्हा दाखल करावा, यासाठी रयत शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुनिल ठोसर यांनी तहसीलदार गेवराई मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे, नामदेव जाधव यांच्या कुटुंबियांना १० लाखाची मदत नाही मिळाली तर रयत शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल असा इशारा निवेदनाद्वारे दिले आहे