विद्यार्थ्यांनी घडविला नृत्याविष्कार- एंजल्स स्टार कॉन्व्हेंटच्या उद्घाटनाचे औचित्य

41

✒️नितीन पाटील(नेरी प्रतिनिधी)

नेरी(दि.15मे):-वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठान द्वारा संचालित एंजल्स स्टार कॉन्व्हेंटचा उद्घाटन समारंभ अलिकडेच वडसी येथे संपन्न झाला.कॉन्व्हेंटच्या उद्घाटनप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला.या सांस्कृतिक कार्यक्रमात शालेय विद्यार्थी,गावातील युवक व युवती यांनी सहभाग घेतला.विद्यार्थी व युवक,युवतींनी विविध गीतांवर नृत्याविष्कार सादर केला.सामाजिक,देशभक्तीपर गीतांवर विद्यार्थी याप्रसंगी थिरकले.सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी यानिमित्ताने गाववासीयांना अनुभवायला मिळाली.

सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड.भूपेश पाटील यांनी केले.प्रमुख अतिथी प्रतिष्ठानच्या कोषाध्यक्षा डॉ.सीमा पाटील,एंजल्स स्टार कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका प्रेमिला जांभुळे,नितीन पाटील उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना ॲड.भूपेश पाटील यांनी कॉन्व्हेंटच्या माध्यमातून बालकांच्या सर्वांगिण विकासासाठी विविध उपक्रम राबविले जाणार असून बालकांचा सर्वांगिण विकास कसा होईल हे कटाक्षाने बघितले जाईल.सांस्कृतिक कार्यक्रमातून मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यास मदत होते.एंजल्सच्या माध्यमातून अशा सुप्त गुणांना वाव देण्यासाठी वर्षभर विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात येईल असे भूपेश पाटील यांनी प्रतिपादन केले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे संचालन रिना पाटील यांनी केले.आभार सोनू जांभुळे यांनी मानले.कार्यक्रमाला गावातील पालक,नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.