अर्हेर- नवरगाव येथे अवैधरीत्या जुगार खेळणाऱ्यांवर पोलीसांकडून छापा

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.14 मे):-पोलीस स्टेशन ब्रम्हपूरी अंतर्गत मौजा अर्हेर- नवरगाव येथे ताशपत्त्यावर पैशाची बाजी लावून अवैधरीत्या जुगार खेळणा-या लोकांवर ब्रम्हपूरी पोलीसांनी छापा टाकला. त्यांचेकडून नगदी कॅश, मोबाईल ई. वस्तू जप्त करण्यात येऊन त्यांचेविरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

दि. 14 मे रोजी शनिवार ला सायंकाळी ब्रम्हपूरी पोलीसांना गोपनीय माहीती मिळाली की, मौजा अर्हेर- नवरगाव येथील बाजार चौकमधील संजय मेश्राम याचे दूकानाच्या मागे काही लोक ताशपत्त्यावर पैशाची बाजी लावून अवैधरीत्या मोठा जुगार खेळत आहेत. त्यावरून ब्रम्हपूरी पोलीसांनी आपली ओळख लपवून सदर ठिकाणी खाजगी वाहनाने जाउन रेड टाकली. पोलीस पाहून जुगार खेळणारे पळण्याच्या प्रयत्न करू लागताच 7 जणांना पकडण्यात आले.

त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे ताब्यातून एकत्रितरीत्या 90,550 रू. नगदी कॅश, 3 मोबाईल एकूण किंमत 20800 रू. 50 रू. ताशपत्ते असा एकूण 111400 रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ” जुगार खेळणाऱ्यांना पोस्टेला आणून त्यांचेवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदयाअन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदरची कार्यवाही श्री. मल्लिकार्जून इंगळे, उपविभागीय पोलीय अधिकारी, मुल अतिरीक्त कार्यभार ब्रम्हपूरी व पोलीस स्टेशन ब्रम्हपूरीचे ठाणेदार रोशन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनी मोरेश्वर लाकडे, पोहवा / अरून पीसे, अशोक मांदाडे, नापो / योगेश शिवनकर, उमेश बोरकर, पोशी/नरेश कोडापे, प्रमोद सावसाकडे, प्रकाश चिकेराम यांनी केली.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, विदर्भ, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED