धर्मवीर शंभूराजे यांची जयंती व आमदार राजेशजी पवार यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न

✒️नायगांव प्रतिनिधी(हानमंत चंदनकर)

नायगाव(दि.16मे):-धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांची जयंती गुरुवर्य परमपूज्य नाराश्याम महाराज मठ संस्थान येवती व शिवाचार्य डॉ विरुपक्ष महाराज मुखेडकर यांच्या उपस्थितीत नायगाव ( बा) येथे मोठ्या थाटामाटात व उत्साहात पार पडली!मा आमदार श्री राजेशजी पवार साहेबांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यास लहान चिमुकल्यानी औक्षण करत सुरुवात केली .दोन्ही गुरुवर्यांनी आपल्या आशीर्वाद रुपी संभोधनात साहेबांच्या कामांची प्रशंसा करत साहेबांच्या हातून अशीच समाजसेवेची कामे व्हावीत असा प्रोत्साहनपर आशीर्वाद साहेबांना दिला .नायगाव ,धर्माबाद, उमरी तालुक्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी ,शेतकरी बांधव ,महिला पदाधिकारी ,जेष्ठ व वरिष्ठ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली .मतदारसंघातील कानाकोपऱ्यातूंन व नांदेड शहरातून साहेबांवर प्रेम करणारे आप्तेष्ट ,मित्र व सहकारी यांनी दोन्ही सोहळ्यास आपली उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

आप्तस्वकीयांचा जीहवाला एवढा की तब्बल चार तासांपेक्षाही जास्त वेळ सोहळा साजरा होऊनही उत्साह तसु भर ही कमी पडला नाही..साहेबांनी आपल्या भाषणांत दोन्ही गुरुवर्याचे आभार मानत शिवाचार्य डॉ विरुपक्ष महाराजांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या मानवता विचार मंच ट्रस्टच्या माध्यमातून चालणाऱ्या अनाथ वृद्धाश्रम चे उर्वरित काम पूर्णत्वास नेण्यासाठी अडीच लक्ष रुपये निधी जाहीर केला !साहेबांनी आपल्या भाषणाच्या उत्तरार्धात गुरुवार्याच्या समक्ष मतदारसंघाच्या विकासासाठी माझ्या सर्व शक्तीनिशी मी काल ,आज आणि उद्या ही कटीबद्ध होतो आहे आणि राहणार याचे जणू वचनचं दिले.प्रसन्न अश्या संध्याकाळी उपस्थित सर्वांनी सुप्रसिद्ध गायक अशोकजी ठावरे संचालित संगीत मंचाकडून सादर केलेल्या संगीताचा व सुरुची भोजनाचा यथोचित आस्वाद घेत धर्मवीर शंभूराजे यांची जयंती व कार्ततत्पर आमदार श्री राजेशजी पवार यांचा अभिष्टचिंतन या दोन्ही सोहळ्याचा दुग्धशर्करा योग हर्षोल्हासात अनुभवला !

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED