पैसा आणि रोजगार कमविण्यासाठी कौशल्य असले पाहिजे- नितेश मोगरकर

38

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

भंडारा(दि.16मे):-विद्यार्थ्यांनो, तुम्ही आपल्या शैक्षणिक जीवनाची पहिली पायरी पूर्ण केल्या. म्हणजेच दहावीची बोर्डाची परीक्षा दिल्यात. त्यासाठी किती अभ्यास करावा लागतो ते तुम्ही अनुभवले. आता नेमकं दहावी नंतर पुढे काय ?? हा प्रश्न तुमच्या मनात गुंजत आहे. आता सरळ अर्थाने म्हणायला गेलं तर दहावी नंतर काय तर अकरावी आणि बारावी हे एकच उत्तर आपल्याला मिळतो. मग अकरावी आणि बारावी करायचं तर कोणत्या क्षेत्रात करावे हा सुद्धा प्रश्न मनात येतो. आता अकरावी-बारावीला तीन क्षेत्र असतात. विज्ञान, कला आणि कॉमर्स. या तीन क्षेत्रातील ज्या क्षेत्रात आपल्याला आवड आहे तो क्षेत्र आपल्याला निवडून अकरावीत प्रवेश करावा लागतो. तर मित्रांनो, विज्ञान हे असं आहे की, या क्षेत्रातुन आपल्याला खूप साऱ्या संधी उपलब्ध असतात.

उदा.डॉक्टर्स, इंजिनिअर, इलेक्ट्रीशियन यांसारखे विविध प्रकारचे असे क्षेत्र आहेत की, जेथे आपल्याला रोजगार मिळू शकतो. तसेच कला हे असे क्षेत्र आहे कि जेथे आपल्याला पोलीस भरती, तलाठी भरती, वन विभाग परीक्षा, MPSC राज्यसेवा परीक्षा यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला संधी मिळते. कॉमर्स हे असे क्षेत्र आहे की, ज्या मध्ये आपल्याला अकाऊंटीग म्हणजे बँकिंग क्षेत्रात संधी उपलब्ध होते. हे असे तीन महत्त्वाचे क्षेत्र अकरावी आणि बारावीमध्ये आहेत. या सर्व क्षेत्रांची तयारी बारावी नंतरच नाही तर तुम्ही दहावी नंतर सुध्दा करू शकता. तसेच आपल्याला काय करायचं आहे हे आपल्या स्वतः लाच ठरवावा लागतो. आपल्याला आपले करीयर निश्चित करायचे आहे तर स्वतः च निर्णय घ्यावा लागतो. माझा मित्र विज्ञान क्षेत्रा कडे जातो तर मी ही आपल्या मित्रासोबत विज्ञान घेतो. माझ्या नातेवाईकांनी किंवा माझ्या आईवडीलांनी कॉमर्स घ्यायला सांगितला तर चला मी कॉमर्सच घेतो. असं नाही. आपल्याला काय करायचं आहे??

मी कोणत्या क्षेत्रात यश संपादन करू शकतो, मला कोणता क्षेत्र आवडतो आणि मला कोणत्या क्षेत्रात रोजगार मिळू शकतो या सर्व गोष्टींचा निर्णय आपण स्वतः च घ्यायला हवं. आयुष्यात आत्मनिर्भर रहायला हवं. स्वतः वर आश्रीत रहायला हवं. स्वतःचा निर्णय स्वतः घेणे हे गरजेचे आहे. तसेच करिअर निवडताना कारण माहीत असणं गरजेचं आहे. आपण तो करिअर का म्हणून निवडायचे आहे हे आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. मित्र करत आहेत म्हणून मी सुध्दा नोकरी करतो, आई बाबा म्हणतात म्हणून नोकरी करतो किंवा पैसा कमविण्यासाठी करिअर करतो. हे असे कारण चुकीचे आहे. निव्वळ पैसा कमविणे म्हणजे करिअर नव्हे तर आपल्या त्या करिअर चा समाजात आणि समाजात राहणाऱ्या नागरिकांना फायदा झाला पाहिजे आणि त्यांचे काम पूर्णपणे झाले पाहिजे , तेव्हा आपल्या करिअर ला महत्त्व राहते. त्याचप्रमाणे..महत्त्वाचे म्हणजे पैसा आणि रोजगार कमविण्यासाठी कौशल्य असले पाहिजे. हे आपल्याला दैनंदिन जीवनात अत्यंत महत्त्वाचे आहे. पैसा तर आपण कसाही आणि कुठूनही कमवू शकतो मात्र त्यासाठी आपल्या अंगी कौशल्य असणे गरजेचे आहे. सर्वात शेवटी सांगायचे झाल्यास ह्या सर्व गोष्टी करुन ही व्यवसाय किंवा रोजगार नसेल मिळेत तर शेवट चा प्रयत्न एकच करा तो म्हणजे मग स्पर्धा परीक्षांची तयारी करा आणि समाजात एक आदर्श अधिकारी व्हा. असे मार्गदर्शन पुणे येथील जि.प शिक्षक आदरणीय नितेश मोगरकर सर यांनी केले.

तद्वतच, दहावी बोर्डाची परीक्षा ही nतर महत्त्वाची असते त्यापेक्षा बारावी बोर्डाची परीक्षा सुध्दा आपल्या करिअर साठी अत्यंत गरजेची असते. यासाठी दहावी नंतर अकरावी आणि बारावी करीता लागणारे तीन क्षेत्रा पैकी आपल्याला जो क्षेत्र आवडतो त्या क्षेत्राचा अतिशय तिक्ष्ण बुध्दीने विचार करून अकरावी आणि बारावी ला प्रवेश करावा. करिअर हे आपल्या साठी खूप महत्त्वाचे आहे आणि त्याचा निर्णय घ्यायला हवा. तुम्हाला जर डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हायचं असेल तर त्यासाठी आवश्यक JEE-NEET ची तयारी करणे गरजेचे आहे आणि ते तुम्ही दहावी नंतर विज्ञान शाखा घेऊन तुम्ही त्या परीक्षांची तयारी करु शकता. जर तुम्हाला समाजाची सेवा करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला एक उत्तम अधिकारी होणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला सर्वात सोपे म्हणजे दहावी नंतर कला शाखा घेऊन MPSC आणि UPSC ची तयारी करु शकता. आणि हे करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन नागपूर येथील फॉरेन्सिक सायन्स ची विद्यार्थिनी कु.दिव्या बोरकर तुमसर, यांनी केले.

स्थानिक विद्यार्थी-शिक्षक मित्र अभ्यास मंडळ तुमसर आणि माझी माय सरसोती समूह भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “दहावी नंतर पुढे काय??” या विषयावर श्री.नितेश मोंगरकर आणि कु.दिव्या बोरकर हे आभासी बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतुन प्रा.संजय लेनगुरे सर यांनी. कुमारावस्थेतून युवकावस्थे मध्ये पदार्पण कऱीत असताना विद्यार्थ्यांच्या मनात येणारे विचार आणि होणारे बदल नैसर्गिक असून त्यानुसार योग्य निर्णय घ्यावा व योग्य दिशा ठरवावी. हितावह आहे, याकरिताच विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे काळाची गरज आहे, असे मत मांडले.

सदर ऑनलाईन मार्गदर्शन सत्रात प्रमुख अतिथी म्हणून प्रा.सौ.सुषमा पाटील कोल्हापूर, कु.पूनम बांगरे,सौं. कल्पना मल्लेवार, श्री. चुनीलाल कापगते सर, श्री. रमेश बोंद्रे सर यांनी स्थान भूषविले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाल बांडेबुचे, प्रगती अवथरे यांनी तर आभार जानवी ठवकर, रचिता पारधी यांनी मानले . सदर मार्गदर्शन सत्रात तालुक्यातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रक्षा रहांगडाले, आचल पटले, गायत्री गुरव, भूमिका तुरकणे, सुहानी पवारे, पार्थ बागडे, संकल्प मेश्राम, सुगत रामटेके, त्रिवेणी पटले, महेश गणवीर, अनुजा सार्वे, पलक कांबळे, हिमांशी साठवणे, अंजली गिरीपुंजे, मनीषा बावणे, तृप्ती बघेले, अनिकेत भजगवळी, सलोनी ठवकर, काजल बुरडे, प्रीतम अवचट, लेहान कनोजे, हरिचंद्र शिंगाडे, वैष्णवी ढेंगे, आरती बडवाईक, सुमित भगत यांनी अथक परिश्रम घेतले.