तलवाडा येथे बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी

✒️तलवाडा प्रतिनिधी(शेख आतिख)

तलवाडा(दि.16मे):-महाबोधिसत्त्व प्रतिष्ठाण च्या वतीने तलवाडा येथे बौद्ध पोर्निमा साजरी करण्यात आली.सर्वप्रथम जि.प.सदस्य युवराज तात्या डोंगरे व पोलीस अधिकारी आयु खंडागळे साहेब यांच्या हस्ते*पंचशील ध्वजा* चे ध्वजारोहण करण्यात आले व पूजापाठ ही करण्यात आला. यानंतर महाबोधिसत्त्व प्रतिष्ठाण* चे अध्यक्ष *आयु. विजय डोंगरे* यांनी वंदना,पंचशील बुद्ध पूजा केली व यावेळी उपदेशही केला.यानंतर सुमेध करडे यांनी जयंती निमित्त धम्म बांधवाना शुभेच्छा देऊन मनोगत व्यक्त केले.यानंतर उपस्थित धम्म बांधवाना खिरदान* आयु.पल्लवी ताई डोंगरे यांनी केले. व कार्यक्रमाची सांगता झाली.

यावेळी धम्मबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माऊली नाना डोंगरे,गीतारांम डोंगरे,रवि डोंगरे,रमेश आठवले,हर्षद आठवले,विनोद आठवले,सचिन डोंगरे सर,बुद्धभूषण डोंगरे,किशोर आठवले ,अजिंक्य डोंगरे,महेश आठवले,सुशील वाघमारे
गंगाबाई डोंगरे,पल्लवी ताई डोंगरे त्वरिता अर्बन च्या चेअरमन अनिता डोंगरे,सोनाली डोंगरे इत्यादी धम्म बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन*महाबोधिसत्त्व प्रतिष्ठाण* तलवाडा यांनी केले.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED