राष्ट्रीय मानवाधिकार परिषदेचा गौरव पुरस्कार समारोप

88

✒️अंबाजोगाई प्रतिनिधी(शेख फिरोज)मो:-7020475287

आंबेजोगाई(दि.16मे):- – पूना येथीलआजम कॅम्पस येथे ‘जागतिक मानवाधिकार परिषद’ संस्थेचा राष्ट्रीय कार्यकर्ता परिषद आणि पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. दूरदूरवरून आलेल्या अधिकाऱ्यांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला, तसेच सामाजिक कार्य, पत्रकारिता, शिक्षण, पर्यावरण, वैद्यक क्षेत्रात आपले योगदान देणाऱ्या महान व्यक्तीचा गौरव करण्यात आला.मुख्य सल्लागार हाजी आयएएस जामा व राष्ट्रीय प्रमुख डॉ. सरचिटणीस प्रसून गोस्वामी यांनी राष्ट्रीय अध्यक्ष एम.आर.अन्सारी यांचा गौरव केला

त्यानंतर त्याच क्रमाने राष्ट्रीय कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांचाही राष्ट्रीय अध्यक्ष व इतर अधिकाऱ्यांच्या हस्ते संयुक्तपणे गौरव करण्यात आला.उपाध्यक्ष सलाहुद्दीन गौरी, राष्ट्रीय मुख्य महासचिव प्रसून गोस्वामी , राष्ट्रीय उपाध्यक्ष मौलाना अन्वारुल हक, राष्ट्रीय संघटन सचिव मुईन अख्तर खान महाराष्ट्र अध्यक्ष हाजी लायक व मोठ्या संख्येने अधिकारी या सत्कार समारंभात सहभागी झाले होते.या सत्कार समारंभात बीड जिल्हातील निसार अहमद तांबोळी महाराष्ट्र मीडिया प्रभारी यांचा गौरव करण्यात आला.