डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे गर्भवती मातेसह बाळाचा मृत्यू

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.16मे):-जिल्ह्यातील माजलगाव शहरातील खाजगी रुग्णालयामध्ये गर्भवती महिलेसह पोटातील बाळाचा मृत्यू झाला आहे. तर हा मृत्यू डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप मयत गर्भवतीच्या आईसह नवऱ्याने केला आहे. सोनाली पवन गायकवाड (वय- २३) रा. खेर्डा ता. माजलगाव जि. बीड असे मयत गर्भवतीचे नाव आहे.

सोनाली गायकवाड यांना डिलिव्हरीसाठी माजलगाव शहरातील जाजू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, रुग्णालयातील महिला डॉ.उर्मिला जाजु यांनी, योग्य उपचार न केल्यामुळे सोनाली गायकवाड यांचा मुत्यु झाला आहे. असा आरोप नातेवाईकांनी यावेळी केला आहे. यामुळे दोषी डॉक्टरवर कारवाई करावी, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई व्हायला पाहिजे, आणि आम्हाला न्याय द्यावा. अशी मागणी मयत सोनाली गायकवाड यांच्या आईसह नवऱ्याने यावेळी केली आहे

बीड, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED