दुचाकीचा अपघात ,हसनाबाद -पाडूळी चे सरपंच कोंडीराम हजारेंचा मृत्यू

🔸गावावर शोककळा

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)

सिरसाळा(दि.17मे):- सिरसाळा – परळी रोडवरील रेवली पाटीवर दुचाकीने दालेल्या धडकेत हसनाबाद – पाडूळी संयुक्त ग्रामपंचायत चे सरपंच कोंडीराम उर्फ भागवत हजारे यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.या विषयी सविस्तर वृत्त असे कि, हजारे काही कामानिमित्त परळी येथे आपल्या सहकाऱ्यां समावेत दुचाकीवरुन परळी जात होते. जात असतांना रेवली फाटी येथील चहा हाॅटेल कडे गाडी वळवत असतांना मागून आलेल्या दूस-या एका दुचाकीने जोराची धडक दिली. यात कोंडीराम हजारे गंभीर जखमी झाले.उपचारार्थ अंबाजोगाई – लातूर येथे दवाखान्यात दाखल केले पंरतु मार खुप असल्याने त्यांचा मृत्यू झाला. ह्या दोन दुचाकी अपघातात दुसर्‍या चालकास देखील गंभीर दुखापत झाल्याचे समजते आहे. सरपंच हजारे यांच्या मृत्यूने हसनाबाद – पाडूळी सह सिरसाळा परिसरातील जनता शोकाकूल झाली आहे.

● मन मिळावू व्यक्तीमत्व हरवले : कोंडीराम हजारे अंत्यत मन मिळावू व्यक्तीमत्व अशी त्यांची सिरसाळा परिसरात ओळख होती.जात-धर्म,पक्ष, राजकारण असा भेद त्यांनी कधी केला नाही. कुणीही असो त्याच्याशी प्रेमाळ स्वाभावाने ते बोलत असत आणि आपल्या व लोकहिताच्या कामाला ते अधिक महत्त्व देत असत. त्यांच्या निधनाने सिरसाळा परिसरातील एक मन मिळावू व्यक्तीमत्व हरवले आहे. दैनिक लोकाशा हजारे कुटुंबाच्या दु:खात सहभागी आहे.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED