


✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.17मे):-या कार्यक्रमाची सुरुवात संत जनाबाई यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून या कार्यक्रमाला सुरुवात झाली. यानंतर मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी बाभट साहेब यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले .आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी कंपनी विभागीय व्यवस्थापक श्री दत्ता इथापे सर यांनी जंगी व धनदेव प्लस या कपाशी वाणा बद्दल व गुलाबी बोंडआळी नियंत्रण या विषयावर शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली व मागील वर्षी जंगी व धनदेव प्लस वाण लागवड करून ईतर वाणा पेक्षा अधिक उत्पन्न घेतलेल्या ज्ञानोबा कदम व इतर शेतकऱ्यांनि आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला १०० पेक्षा जास्त शेतकरी उपस्थित होते तसेच उपस्थित शेतकऱ्यानं पैकी तीन लक्की ड्रॉ काडून त्यांना भेट वस्तु देण्यात आली. या कार्यक्रमाला शेतकरी प्रतिनिधी म्हणून किशनराव गिनगिने, वितरण प्रतिनिधी गोपाळ सावरे, कंपनी प्रतिनिधी शुभम बाभट, हे होते. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी कंपनी प्रतिनिधी गोपाळलाड,अनिल चव्हाण, हीके यांनी परिश्रम घेतले




