विवेक कुचेकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाने बालाघाटावर राष्ट्रवादी ची ताकद वाढली

✒️नवनाथ आडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)

बीड(दि.17मे):-शोषित,पिडित,ऊसतोड मजुर,गोरगरीब, वंचित दिन दलितांचा युवानेता म्हणून ओळख असलेल्या विवेक कुचेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्याने बालाघाटावर राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली आहे.आगामी काळात याचा फायदा नक्कीच पक्षाला होणार असुन विवेक कुचेकर यांच्या पाठीशी असलेला युवा वर्गात या प्रवेशाने उत्साह संचारला आहे.बीड तालुक्यातील चौसाळा कर्मभुमी असलेल्या विवेक कुचेकर यांनी आतापंर्यत सामाजिक कार्यातुन आपली ओळख निर्माण केली. गरजु आणि वंचित घटकांसाठी सातत्याने रस्त्यावर उतरून व्यवस्थेविरूध्द रान उठविण्याचे काम करत विवेक कुचेकर यांनी अनेकांना न्याय मिळवून दिला.लोकाभिमुख समस्यांना वाचा फोडण्याचे काम विवेक कुचेकर यांनी आपल्या आंदोलनातुन केले आहे.

चौसाळा आणी सर्कलमध्ये विविध आंदोलने उभारून गोरगरीब जनतेसह शेतकरी वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आवाज उठविला आहे. गोरगरीब, वंचित आणी उपेक्षित घटकांच्या आवाजाला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे बळ मिळाले आहे.चौसाळा, लिंबागणेश,पाली,नेकनुर सर्कलमध्ये विवेक कुचेकर यांना माननारा वर्ग मोठया प्रमाणावर आहे.वंचित समुहाला न्याय मिळवून देण्यासाठी धडपड करणारे नेतृत्व विवेक कुचेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने आता चौसाळा सर्कलसह बालाघाटावर राष्ट्रवादी काँग्रेसची ताकत वाढली आहे

बीड, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED