


✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
उमरखेड(दि.17मे):-जगाला शांतीचा व अहिंसेचा मार्ग दाखवणारे, राज्य वैभवाचा त्याग करणारे, मानवाच्या कल्याणासाठी आपले जीवन अर्पण करणारे दुःखी मुक्तीचा मार्ग सांगणारे, विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती उमरखेड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड मधील सम्यक बौद्ध विहारमध्ये मोठ्या आनंदात साजरी करण्यात आली.
सकाळी 8:30मी ला कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम महाकरूनिक तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बौध्दिस्तव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
तर पंचशील ध्वजारोहण भदंत कीर्ती बोधी यांच्या हस्ते करण्यात आले.
आणि उपस्थित सर्व वतीने पंचशील ध्वज गीत सादर करून त्रिसरण पंचशील भदंत कीर्ती बोधी यांनी यांनी ग्रहण केले.
तर रात्री 8 वा. महिलांनी बुद्ध भीम गीते गाउन ही बुद्ध पौर्णिमा (बुद्ध जयंती) मोठ्या आनंदाने साजरी केली.
तर यातच अधिक भर म्हणून स्वादिष्ट खीर वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या स्वादिष्ट खीर चा सर्वांनी आनंद लुटला.
यावेळी कुमार केंद्रेकर (अध्यक्ष शांतिदुत समिती), बौद्धचार्य शंकरराव दिवेकर, माजी नगरसेविका हिराबाई दिवेकर, सिद्धार्थ दिवेकर (शहराध्यक्ष भीम टायगर सेना उमरखेड), संतोष इंगोले, शुद्धोधन श्रवले, दीपक इंगोले,मारोती दिवेकर,गौतम दिवेकर, प्रफुल दिवेकर, शुद्धोधन आठवले, अजय दिवेकर, किशोर दवणे, अनुसयाबाई दिवेकर, जिजाबाई दिवेकर, आनंदाबाई दिवेकर, यशोदाबाई दिवेकर, यशोधराबाई धबाले, ज्योतीताई इंगोल, जानकाबाई इंगलो, उषाबाई इंगोले इत्यादी अनके बालक बालिका उपस्थित होते.




