……आणि बुद्ध हसले!

घटना क्र.1-दिनांक 5 मे 2022 ची.स्थळ-हेरवाड, जि. कोल्हापूर… विधवा प्रथा बंद चा निर्णय…

ही घटना ऐतिहासिक.त्यामुळेच आता तिची चर्चा होत आहे.

घटना क्र.2-दिनांक 14 ऑक्टोबर 1956,स्थळ-नागपूर..
बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्म आपल्या लाखो बांधवांना देत वैज्ञानिक दृष्टिकोन दिला.

दोन घटनांमध्ये 66 वर्षाचा फरक. अर्थात शाश्वत विकासासाठी एवढा कालावधी अपेक्षित.1956 ला लाखो महारांनी हिंदू धर्म त्यागून बौद्ध धम्म स्वीकारला आणि हळूहळू हिंदू धर्मातील चालीरीती त्यागण्यास सुरुवात केली.आज 80 टक्के (100 टक्के नाहीच!)बौद्ध बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 पैकी बहुतेक प्रतिज्ञा पाळतात (मद्य सोडून).सांगायचा मुद्दा हा की वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला किंबहुना विज्ञान हेच तत्व सांगणारा बुद्ध धम्म रुजतो आहे. बौद्ध धम्मात आता विधवा प्रथा जवळपास बंद होत आहेत.बांगड्या फोडणे, कुंकू न लावणे हे सर्व थांबले आहे.

6 महिन्यांपूर्वी माझे वडील मरण पावले. गावचे सारे आप्तेष्ट उपस्थित होते. अंत्यसंस्कार झाल्यावर काहीजण जुन्या चालीरीती करण्याचा प्रयत्न करीत असताना या सर्व प्रकारास माझ्या आईसह गावातील अल्पशिक्षित महिलांनी विधवा प्रथेला कडाडून विरोध केला. कुठलेच संस्कार नकोत ही भूमिका आईसह गावातील महिलांनी घेतली.आता गावागावात विधवा प्रथा जवळपास हद्दपार होत आहेत.अलीकडे एका कार्यक्रमात गेलो असतो माझ्या बायकोच्या आत्याने तिला जोडवे का लावत नाही म्हणून झापले. बायको म्हणाली मी लग्नापासूनच लावत नाही.शेवटी तिची आत्या शांत झाली.म्हणजेच अलीकडच्या मुली जुन्या चुकीच्या प्रथा हळूहळू कमी करीत आहेत,हे बघायला मिळते आहे.

मासिक पाळी आणि बौद्ध हेही एक वेगळे समीकरण आहे.आज मासिक पाळी वर जनजागृती करावी लागते आहे पण बहुतेक बौद्ध धर्मात मासिक पाळी आता सन्माननीय झाली आहे.
इतर धर्मात आता बदल स्वीकारण्याची मानसिकता तयार होत आहे.हेरवाड येथील घटना दूरगामी परिणाम करणारी असल्यानेच आता तिचे अनुकरण करण्याची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे.हेरवाड च्या घटनेने बुद्ध तर सुखावले असणारच पण राजाराममोहनराय, महात्मा फुले, धोंडो केशव कर्वे आदी समाजसुधारकांच्या प्रयत्नांना यशाची गोमटी फळे लागली आहे.
त्यामुळेच हेरवाड वासीयांचे मनापासून धन्यवाद.

✒️अरविंद खोब्रागडे(चंद्रपूर)मो:-9850676782

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, विदर्भ, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED