आरोपीच्या शोधात गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला; दगडफेक, मारहाणीत दोन पोलिस जखमी

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

कडा(बीड)(दि.19मे):-गुन्ह्यातील आरोपीच्या शोधासाठी गेलेल्या दोन पोलिसांवर वस्तीवरील जमावाने हल्ला केल्याची घटना आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास आष्टी तालुक्यातील पारोडी येथे घडली. जमावाने दगडफेक व लाठ्याकाठ्यांनी हल्ला केल्याने दोन पोलिस जखमी झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, आष्टी तालुक्यातील अंभारो पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पाच पोलिस कर्मचारी पारोडी येथे गेले होते. जीपमध्ये तीन पोलीस कर्मचारी थांबत यातील पोलीस नाईक प्रल्हाद देवडे व पोलिस काॅन्सटेबल शिवदास केदार हे दोघे पारधी वस्तीवर गेले. पोलीस दिसताच वस्तीवरील जमावाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला.

दगडफेक आणि लाठीकाठीने मारहाण केल्याने पोलीस जखमी झाले आहेत. जखमी पोलिसांवर खुटेफळ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. दरम्यान, घटनास्थळी आष्टीचे उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर, सहायक पोलीस निरीक्षक रोहित बेंबरे, दंगल नियंत्रण पथक व पोलिस कर्मचारी तळ ठोकून आहेत.

बीड, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED