अपघातात गंभीर जखमी झालेल्या वासरूला एकनिष्ठाने दिले जीवनदान

✒️खामगाव(पुरोगामी न्युज नेटवर्क)

खामगांव(दि.19मे):- गौ-सेवेत सदा अग्रेसर असलेल्या एकनिष्ठा गौ-सेवा फाऊंडेशननी दिले वासरूला जीवनदान सविस्तर हकीकत अशी आहे की नांदुरा रोड स्थित काल दिनांक 18 में रोजी सायंकाळी 5:30 वाजता टाटा शो रूम समोर एक लहान वासरूला अज्ञात क्रुझर गाडी वाल्याने जबर धडक देऊन गंभीर जखमी केले घटनेची माहिती लॉयन्स क्लबचे अभय अग्रवाल यांनी देताच एकनिष्ठा गौ-सेवक सुरजभैय्या यादव, विक्की सारवान, अजय व्यवहारे, अमन जाधव, उमेश कळसकार, सिद्धेश्वर निर्मळ आदि गौ-सेवक पोहचले व डॉ राऊत यांना बोलावून अपघातात गंभीर जखमी झालेल्या वासरूवर उपचार करून दिले.

नवीन जीवनदान गौ-मालकाचा शोध घेऊन सुरेश नेमाडे त्यांच्या ताब्यात दिले व तसेच त्यांना गौ-सेवकांनी समज दिली या पुढे नेशनल हायवे रोडवर परत वासरूला सोडू नका तुमच्याने जर वागवत जात नसेल तर ती गौरक्षण मध्ये देऊन द्या या गौ-सेवेला औषधोपचाराला लागणारा खर्च एकनिष्ठा गौ-सेवा फाऊंडेशनच्या गौ-सेवकांनी केला अशी माहीती अजय व्यवहारे यांनी दिली.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED