कमलापूर, पातानील येथील हत्तींचे स्थलांतर रोखण्याकरिता जिल्ह्यातील युवकांची ना.बचू कडू  यांचे कडे मागणी

27

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.19मे):-राज्यातील एकमेव हत्तीकॅम्प असलेल्या कमलापूर येथील चार हत्ती व पातानील मधील हत्तींना गुजरात राज्यातील जामनगर येथील प्राणी संग्रहालयात स्थलांतरित करण्यासाठी शासनाने परवानगी दिली असून. ह्याचा सर्वत्र विरोध केला जात आहे. यापूर्वी काही महिन्या अगोदर ह्याच हत्तींच्या स्थलांतराचा मुद्धा आला असता स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार, खासदार यांनी जिल्ह्यातील हत्ती कुठेही जाऊ देणार नाही असे म्हटले होते मात्र आता शासनाने हतींच्या स्थलांतराकरिता पूर्ण परवानगी दिली असतांना जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी गप्पच बसलेले आहे.

त्यामुळे गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर आलेल्या महाराष्ट्र राज्याचे मंत्री ना.बच्चू कडू यांच्या कडे  जिल्ह्यातील वन्यजीव प्रेमी,
जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त अनुप कोहळे, वन्यजीव प्रेमी मोहन नामेवार, नंदूजी नरोटे, पिंकू बावणे, निजाम पेंदाम, मयुर गावतुरे, संजय चन्ने, पप्पू गटलेवार यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन जिल्ह्यातील हत्तींचे स्थलांतरन रोखण्याकरीता मुद्दा शासन दरबारी लावण्याकरिता निवेदनाच्या माध्यमातून विनंती केली आहे.
सद्यस्थितीत शासकीय हत्तीकॅम्प कमलापूर येथे आठ हत्ती आहेत. त्यापैकी चार हत्ती व पातानील येथील येथील हत्तींना स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा निर्णय गडचिरोली जिल्ह्याची ओळख पुसून टाकणारा असल्याचे वन्यजीव प्रेमी युवकांचे व गडचिरोलीकरांचे म्हणणे आहे. गेल्या 15 ते 20 वर्षांपूर्वी गडचिरोली ची ओळख नक्षलवादी व त्यांच्या कारवाया एवढीच मर्यादित होती. मात्र शासकीय हत्तीकॅम्प मुळे कमलापूर सह जिल्ह्याच्या गौरवात भर पडत असल्याचे दिसून येत होते.

जिल्ह्यातील महत्वाचे पर्यटन स्थळ म्हणून कमलापूर पुढे आले. डोंगराच्या पायथ्याशी असलेले जलसंपन्न तलाव, हिरवीगार वनराई यामुळे कमलापूर येथे गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्ट्र, तेलंगणा व आंध्रप्रदेशातील पर्यटक हत्तींना पाहण्याकरिता येत आहेत. त्यामुळे येथील पर्यटन विकासाला चालना मिळत असतांनाच शासनाकडून येथील हतींना हलविण्याची तयारी चालवली जात असल्याने जिल्ह्याभरातून पर्यटक व वण्यजीवप्रेमी कडून ह्याचा निषेध करण्यात येत आहे.