५२ टक्के ओबीसी राजकीय दृष्टीने संघटित झाला तर?

ओबीसी समाज ज्या पक्षाचा मानसिक गुलाम होतो त्याला तो सत्ताधारी बनवितो असा इतिहास आहे.५२ टक्के ओबीसी वेगवेगळ्या जातीत विभागला आहे. त्यातील काही ओबीसी स्वताला इतरांपेक्षा उच्च वर्णातील वर्गातील समजतात. जशा कि माझा सुतार समाज हा विश्वकर्मा ब्राम्हण समजतो.वधू वर मेळावे घेतांना श्री विश्वकर्मा पांचाल (पाचही गोत्र) समाजचा ओबीसी जातीचा उल्लेख आवर्जून केला जातो.गणगोत्र काय काय माहिती सांगितल्या जाते.आम्ही हिंदू ओबीसी एवढे लिहले तरी जात पोटजात विचारली जाते.असे असूनही ५२ टक्के ओबीसी वेगवेगळ्या पक्षात झोकून देऊन काम करतात. कॉंग्रेसने ओबीसी जाती पोट जाती मध्ये एक एक नेता निर्माण केला. ते सर्व ओबीसी म्हणून एकत्र येणार नाही याची कायम दक्षता घेतली. कॉंग्रेसला मोठे करून साठ वर्षा सत्तेवर बसविण्यात ओबीसीचे मोठे योगदान आहे.

बच्चा बच्चा राम का जन्मभूमी के काम का बोबीच्या देठापासून घोषणा देणारा ओबीसी धोबी होता. आदिवाशींना वनवासी आणि ओबीसीला कट्टरपंथीय हिंदू बनविण्यासाठी आर एस एस प्रणित अनेक संघटनांनी खूप मेहनत घेतली त्यामुळेच ओबीसी रामरथ यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाला. आणि बेमौत मारल्या गेला.त्यांची नोंद कुणी घेतली नाही. राम मंदिर ची जी मुख्य कमिटी बनविण्यात आली त्यात ५२ टक्के ओबीसीचा एकही ओबीसी प्रतिनिधी नाही. त्यांचे दुख एकाही ओबीसी नेत्यांना कार्यकर्त्यांना समाजाला नाही. म्हणूनच म्हणतात जो स्वताचा इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही. म्हणूनच लिहतो ५२ टक्के ओबीसी आपसात जाती पोटजातीतुन मुक्त झाला. आणि ५२ टक्के ओबीसी राजकीय दृष्टीने संघटित झाला तर? काय होईल.

स्वर्गीय विश्वनाथ प्रताप सिंग जनता दलाचे प्रधानमंत्री असतांना त्यांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला तेव्हा भाजपा ने कमंडल बाहेर काढले. ओबीसींच्या आरक्षणाच्या मंडल आयोगाच्या विरोधात लालकृष्ण आडवाणी ह्यांच्या नेत्रूत्वात रथयात्रा काढल्या गेली. ही रथयात्रा बिहारच्या सिमेवर आली असताना ओबीसी आणी मंडल आयोगाचे कट्टर समर्थक असणाऱ्या लालु प्रसाद यादव यांनी त्याला तिव्र विरोध केला. रथयात्रामुळे देश्यात धार्मिक वाद निर्माण करु जातीय दंगली घडविण्याचे षड्यंत्र आहे. ओबीसी जो मंडल आयोगासाठी आंदोलन करत होता. त्याला भरकटविण्यासाठी भाजपाने रामरथ यात्रा काढली होती. त्या यात्रेला बिहारच्या सिमेवर लालूप्रसाद यादवच्या नेतृत्वा खालील राज्य सरकारने लालकृष्ण आडवाणी यांना अटक केली. जशी अडवाणीला अटक झाली. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांनी व्हि.पि.सिंग सरकारला दिलेला पाठिंबा काढुन घेतला. ओबीसींना शासन प्रशासनात २७ टक्के आरक्षण जाहीर केल्यावर (भाजपा) ने व्ही.पी. सिंह सरकारचा पाठिंबा काढून घेत सरकार पाडले होते हा इतिहास आहे. त्यांची शिक्षा आज मोदी सरकार लालूप्रसाद यादव यांना देत आहे. हेच ५२ टक्के ओबीसी आज विसरला.तरी तो अजूनही भाजपच्या हिंदुत्वाला बळी पडत आहे. आज जे ओबीसींच्या आरक्षणाच्या जोरावर मोठे झाले. समाजात मिरवायला लागलेत आणी भाजपाचीच तळी उचलायला लागलेत. काय अश्या ओबीसीना हा इतिहास माहित नाही काय?.५२ टक्के ओबीसींच्या आरक्षणाच्या विरोधात तेव्हा कोण होते आणि आज कोण आहेत?

५२ टक्के ओबीसी बांधवांनो महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस हा व्यक्ती ओबीसींच राजकिय आरक्षण सुप्रिम कोर्टाने अजुन मान्य केल नाही आणी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक घ्या असा आदेश काढले त्यावर सत्तेत असणाऱ्यांवर आगपाखड करत आहे. मात्र ह्याच देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या पाच वर्षात सत्तेत असताना ओबीसीच्या आरक्षणासाठी काहीच केल नाही. प्रत्येक वेळी वकिल बदलला. ओबीसीसाठी जो अहवाल तयार करुन सादर केला. त्यावर असंख्य चुका करुन ठेवल्या. दिड कोटी चुकांपैकी एकट्या महाराष्ट्रातील चुका ७० लाखांच्या आसपास आहेत.या चुका देवेंद्र फडणवीस यांनी कधी दुरुस्त का केल्या नाहीत? आणी आता म्हणत आहेत की आम्ही ओबीसीला २७ टक्के राजकिय आरक्षण देऊ. महाराष्ट्रातील ओबीसींचा इंपिरिकल डेटा केंद्र सरकार देत नाही. त्याविरोधात देवेंद्र फडणवीस बोलत नाही.राज्य सरकारने हजारदा मागणी करुन देखील ओबीसी आरक्षणाचा हा महत्वपुर्ण देटा केंद्रातील सरकार का देत नाही? याचे उत्तर भाजपाच्या ओबीसी कार्यकर्ता, नेत्याकडे आणि ओबीसी भक्ताकडे नाही.

भारतात ५२ ओबीसींची संख्या आहे. महाराष्ट्रातील राज्य सरकार ओबीसीना आरक्षण देत नाही. बाकीच्या राज्यात तर भाजपाचेच सरकार आहे. मग तिथ ओबीसीला आरक्षण का नाही? देशातील ५२ टक्के ओबीसी पक्षात राहून वेगवेगळे आंदोलन करत आहे. पण पक्षातून बाहेर पडण्याचे धाडस करीत नाही. ५२ टक्के ओबीसी संघटीत झाला तर राज्यात व देशात ओबीसी संख्याच्या बळावर सत्तधारी होऊ शकतो. म्हणुन माझ्या ओबीसी बांधवानो, तुम्हाला जर आपल्या हक्काधिकारांसाठी लढायच असेल.तर ओबीसींची जातनिहाय जनगणनासाठी लढाव लागेल.शत्रू कोण आणी मित्र कोण? यांचा गांभियाने अभ्यास करावा लागेल. ५२ टक्के ओबीसी राजकीय दृष्टीने संघटित झाला तर? राजकीय दृष्टीने धक्कादायक पराभव समोर येईल.

ओबीसी सुतार समाज सामाजिक क्षेत्रातील सर्वंच सुतार समाज सामाजिक संघटना आणी सामाजिक संस्था आणी संबंधित असलेले सन्माननीय सामाजिक जबाबदार पदाधिकारी मान्यवरांच्या नेतृत्वाखाली. ओबीसी सुतार सामाजिक क्षेत्रातील नेतेमंडळी आणी युवा नेतेमंडळी आणी सामाजिक क्षेत्रातील सन्माननीय सामाजिक उपाधी धारकांच्या या सर्वांच्याच नेतृत्वाखाली. ओबीसी सुतार समाज जागृती निर्माण करण्यासाठी जमिनीवर उभे राहून वैचारिक जनजागृती करावी लागेल. ओबीसी सुतार मैदानावर उतरला तर अनेक ओबीसी त्यात सहभागी होऊ शकतात. त्यासाठी ओबीसी सुतार समाज जागृती राज्यस्तरीय जागर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले पाहिजे. समस्त ओबीसी सुतार आंदोलनात का येत नाही याचे मुख्य कारण म्हणजे वरील सर्वंच सन्माननीय ओबीसी सुतार मान्यवरांच्या नेतृत्व करणाऱ्यांचा एकमेकावर ठाम विश्वास नाही. ते राजकीयदृष्ट्या वैचारिक दुष्टीने अपंग आहेत. त्यांना उभे राहण्यासाठी सहारा लागतो. ओबीसी सुतार राज्यस्तरीय समाज मोठ्या संख्येने, मोठ्या प्रमाणात ओबीसी सुतार जागृती मेळाव्यात, ओबीसी सुतार जागृती आंदोलन ठिकाणी उभा राहणार नाही. ही भिती का वाटते कारण यांचे समाजकारण राजकारण प्रामाणिकपणे नाही. जर ओबीसी सुतार सामाजिक क्षेत्रातील राज्यस्तरीय सुतार समाज ओबीसी मेळाव्यात, ओबीसी सुतार आंदोलन ठिकाणी मोठ्या संख्येने, मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिला तर अनेक राजकीय पक्षाचे दुकाने बंद पडू शकतात. याची खात्री यांना का नाही. अथवा अपेक्षित असा सुतार समाज प्रतिसाद मिळावा यासाठी प्रामाणिक प्रयत्न का केल्या जात नाही? हा एक प्रकारे वरील सर्वंच ओबीसी सुतार समाज मान्यवरांना सामाजिक क्षेत्रातील मोठा बदल घडवून अनेक राजकीय पक्षांना जबरदस्त धक्का देऊ शकते.

वैचारिक दुष्ट्या योग्य मांडणी नसल्यामुळे हे एक प्रकारे ओबीसी सुतार सामाजिक क्षेत्रातील ओबीसी बद्दल समाज जागृती बद्दल मोठं अपयश म्हणावे लागेल. ओबीसी सुतार समाज जागृती बद्दल ओबीसी सुतार समाज जमिनीवर सामाजिक दृष्टीने संघटीत झाल्यास अनेकांना धक्कादायक पराभवाला समोर जावे लागेल. स्वतःच्या अस्तित्वासाठी इतरांना उपेक्षितच ठेवण्याची त्यांची मानसिकता सीमित असते असु शकते किंवा त्यांची मानसिकता संकुचित वृत्तीची असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तळागाळातील,उपेक्षित जर पुढे आले तर आपलं स्वतःच अस्तित्व धोक्यात येईल कि काय अशी भीती त्यांना सतावत असते असु शकते, किंवा सतावत सुद्धा असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. स्वच्छ पारदर्शकता असेल निरपेक्ष वृत्ती असेल, संकुचित वृत्ती नसेल तर कोणालाही कशाचीही भीती वाटण्याची गरज भासणार नाही भासत नाही असे वाटते. वैचारिकता महत्वाचा मुद्दा ठरतो विषय आणी क्षेत्र कोणतेही असो. जिथं वैचारिकतेचा अभाव तिथं वैयक्तिक पातळीवर विरोध निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. ५२ टक्के ओबीसी राजकीय दृष्टीने संघटित झाला तर?आपल्या ओबीसी सुतार नेत्यांची सामाजिक पकड व समाज संघटन कौशल्य समाजा समोर गेले पाहिजे. सोशल मीडियावर गोतावळा किती आणी जमिनीवर पाठिंबा समर्थन आणी समर्थक किती याचे आत्मपरीक्षण झाले पाहिजे. ५२ टक्के ओबीसी राजकीय दृष्टीने संघटित झाला तर? देश पातळीवर परिवर्तन झाल्या शिवाय राहणार नाही असं मला वाटते ओबीसी सुतार एकजुट दाखवली तर इतर ओबीसी सुतार समाजा सोबत मन मोकळं उभे राहतील. ५२ टक्के ओबीसी राजकीय दृष्टीने संघटित झाला पाहिजे हाच एकमेव उद्देश आहे.दुसरा कोणताही उद्देश नाही.मला जो इतिहास समजला तो इतिहास आपल्या समोर तोडक्या मोडक्या शब्दात मांडला त्यावर निर्भीडपणे प्रतिक्रियाच्या प्रतीक्षेत आहे. ओबीसी सुतार युवा नेतृत्व मान्यवरांच्या मनोमिलनाचा प्रयत्न यानिमित्याने झाला पाहिजे.आपण सर्वांनी प्रयत्न केला तर नक्कीच यशस्वी होऊ ५२ टक्के ओबीसी राजकीय दृष्टीने संघटित करण्यासाठी सर्वच टिमचे सहकार्य नक्कीच मिळेल ही माझी अपेक्षा आहे.

जय ओबीसी, जय संत भोजलिंग, जय संविधान, जयभिम!

✒️प्रमोद सूर्यवंशी चिखली(मातृतीर्थ बुलडाणा)मो:-8605569521

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED