कॉंग्रेस नेते तथा सेवा सहकारी संस्थेचे माजी उपाध्यक्ष भाजपात प्रवेश

59

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

दि.२० मे शुक्रवार रोजी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात व्याहाड (बुद्रुक) येथील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा सेवा सहकारी संस्थेचे माजी उपाध्यक्ष बाबुरावजी वासेकर यांनी व्याहाड (खुर्द) येथे भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.

याप्रसंगी, त्यांच्या गळ्यात पक्षाचा दुपट्टा टाकून सहर्ष स्वागत केले.यावेळी,भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्‍हा महामंत्री नामदेव डाहुले, ओबिसी मोर्चाचे अविनाश पाल, तालुका महामंत्री सतिश बोम्मावार, अर्जुन भोयर, माजी पं. स. उपसभापती रविन्द्र बोलीवार, नगरसेविका सौ. निलिमाताई सुरमवार, कविंद्र रोहणकर, कुनघाडकर सर, गणपत कोठारे यांचेसह स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.