नागभिड येथे जगद्गुरु श्रींचा भव्य पादुका  सोहळा

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

नागभिड(दि.20 मे):- अनंत श्री विभूषित जगद्गुरु रमानंदाचार्या श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या सिद्ध पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन शुक्रवार दि. 27 मे 2022 ला रेल्वे ग्राउंड नागभिड येथे करण्यात आले आहे,प. पू स्वामीजी आपल्या प्रवचनातून प्रपंच आणि परमार्थ कसा करावा , जीवनात अध्यात्म, विज्ञान आणि व्यवहार याची सांघड घालुन जीवन आनंदमय कसे जगता येईल या बाबत मार्गर्शन करीत असतात.

नरेंद्र महाराज यांच्या जिवन चरित्रवर आधारीत भव्य झांकियां,ढोल तासाच्या गजरात, सिद्ध पादुकांचे भव्य मिरवणूक व शोभायात्रा 30 ते 35 हजार भक्त गणाच्या उपस्थित नागभिड शहरामधुन निघणार आहे,ती शोभायात्रा रेल्वे ग्राउंड कार्यक्रम स्थळी आगमन होणार आहे तरी सदर कार्यक्रमाचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा सेवा समिति चंद्रपूर तर्फे जिल्हाध्यक्ष राजेश येरणे, जिल्हा निरीक्षक अनिल उरकुडे उत्सव समिती अध्यक्ष शुभम पाथोडे व संपूर्ण जिल्हा कमिटी यांनी कळविले आहे.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED