जादूटोणा विरोधी कायदा व वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर विविध प्रयोगातून प्रबोधन

52

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.20मे):-शहरातील पारमिता बुद्धविहार महाविर नगर येथे भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पुसद यांच्यावतीने गेल्या ६ दिवसापासून दहा दिवसीय बौद्धाचार्य श्रामनेर शिबिर चालू आहे .या शिबिरामध्ये दिनांक दि.१९ मे रोजी जादूटोणा विरोधी कायदा व वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर विविध प्रयोगातून प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुकाध्यक्ष ,माजी सैनिक भारत कांबळे, केंद्रीय शिक्षक मुंबई ज्ञानोबा कांबळे, शहराध्यक्ष ल.पु.कांबळे,मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य अनिस युवा सहकार्यवाहक रूपेश वानखडे, श्रीरामपुर ग्रा.प.सरपंच आशिष काळबांडे, उमरखेड तालुकाध्यक्ष धम्मदिप काळबांडे, बौध्दाचार्य किशोर आळणे तसेच ईत्यादी मान्यवरांनी तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुष्प वाहून त्रिशरण पंचशील घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

अंधश्रद्धा निर्मूलन महाराष्ट्र राज्य समिती युवा सहकार्यवाहक , भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सरचिटणीस रुपेश वानखडे जगात चमत्कार होत नसून त्यामागे काहीतरी वैज्ञानिक रासायनिक अभिक्रिया वा हातचलाखी असते यामध्ये पाण्यामध्ये आग लावणे, हवेतून सोन्याची चैन दाखविणे, लोट्यातून पाणी काढणे, जिभेतुन त्रिशुल काढणे इत्यादी प्रयोग प्रात्यक्षिक करून त्यामागील वैज्ञानिक तसेच यावेळी अंगात येणे, भुत लागणे,भानामती करणी,चेटुक ईत्यादी विषयावर उपस्थितांना, बौद्धाचार्य श्रामणेर शिबिरार्थींना मार्गदर्शन करण्यात आले.

दहा दिवशीय बौध्दाचार्य श्रामणेर शिबिरार्थीना श्रीरामपूर सरपंच आशिष काळबांडे व महिला शाखा गांधीनगर यांनी फल्हार दिला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार भगवान खंदारे यांनी केले.