प्रहार जनशक्ती पक्षाच्या मदतीचा एक हात,छकुली देवकर ला देणार घर बांधून

22

✒️नानासाहेब ननवरे(कुरुल,प्रतिनिधी)मो:-9922358308

कुरुल(दि.20मे):- सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील आष्टी या गावातील मरिआई समाजातील छकुली देवकर ही कन्या आपल्या पोटरा या चित्रपटातून आंतरराष्ट्रीय कांस्य चित्रपट महोत्सवात झळकली या चित्रपटातील प्रमुख भूमिकेत असलेल्या छकुली देवकर या मुलीचा जो चित्रपटात संघर्षमय प्रवास आहे तोच खरा आयुष्यात आहे. आई दररोज जोगवा मागायला जाऊन जेमतेम हातावरचं पोट भागवते वडील आजाराने ग्रस्त असून कायमस्वरूपी अंथरुणाला खिळून आहेत. अशा परिस्थितीत स्वतः दहावीपर्यंत शिक्षण घेणारी आणि थोरल्या बहिणी ला बारावीपर्यंत शिकवणारी छकुली ची आई ही अतिशय संघर्षमय जीवन जगत आहे पंचवीस वर्षापासून साध्या पालात राहून या दोन्ही मुलींचा सांभाळ ती करत आहे या आशयाची बातमी एका वृत्तवाहिनीच्या माध्यमातून सोलापूर प्रहारच्या पदाधिकाऱ्यांत पर्यंत पोहोचली.

लोकनायक माननीय बच्चुभाऊ कडू यांच्या सेवा त्याग समर्पण संघर्ष हा विचार प्रणालीनुसार कायमस्वरूपी मदतीसाठी धावून जाणारी सोलापूर प्रहार ही आज या भगिनी च्या मदतीला धावून गेली तीन ते चार महिन्यात चा किराणा बाजार ,गहू, ज्वारी इत्यादी सामान तसेच घरावर टाकायला मोठी ताडपत्री हे सामान तात्काळ स्वरूपात आज प्रहारच्या टीम मार्फत देण्यात आले.सध्या महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आपण सर्वजण पाहतच आहोत अनेक राजकारणी मंडळी कोणी भोंगा कोणी हनुमान चालीसा वाचण्यात व्यस्त आहेत,सध्याची राजकीय परिस्थिती पाहता महाराष्ट्रात अशा अनेक कुटुंबांना अत्यंत हालाखीची जीवन जगावे लागत आहे. परंतु ज्या पद्धतीने ही छकुली देवकर स्वतःच आयुष्य झगडत जगत आहे आणि त्यातून मार्ग काढत पुढे वाटचाल करत आहे. अशा या तडफदार मुलीला आज प्रहारच्या माध्यमातून एक हात मदतीचा देण्यात आला.

जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील आणि शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी शहर कार्याध्यक्ष खालिद भाई मणियार, मोहोळ तालुका संपर्क प्रमुख नानासाहेब खांडेकर, यांच्या टीमने तिथे जाऊन या छकुलीला तात्काळ स्वरूपात मदत करत लवकरच जागा उपलब्ध करून घर बांधून देण्यासाठी पुढाकार घेतला.यावेळी दक्षिण चे शेतकरी तालुकाध्यक्ष सिध्दु काळे मोहोळ तालुका संपर्कप्रमुख नानासाहेब खांडेकर मंद्रुप शहराध्यक्ष उस्मान भाई नदाफ युवा अध्यक्ष तायाप्पा कोळी यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.