पाण्याची किंमत कधी कळणार? – ज्योती यावले यांचा सवाल

27

✒️कारंजा घाडगे,प्रतिनिधी(पियुष रेवतकर)

कारंजा(घा)(दि.21मे):-पाण्याची किंमत कधी कळणार ?भाजपा महिला आघाडी कारंजा शहराध्यक्षा ज्योती यावले यांचा नगरपंचायत ला सवाल?पाणी ,पाणी ,पाणी कारंजा मध्ये पाण्यासाठी हाहाकार असताना कारंजा मधल्या विहिरीच्या पाण्याचा कोणताही उपयोग न होताहे मात्र रडत आहे म्हणून त्यामध्ये कधी जनावरे घेऊन पडतात तर कधी कोणी त्याचा उपयोग जीव देण्यासाठी करतो तरी सुद्धा नगरपंचायत ला जाग मात्र येत नाही .तिला साफ केल्या जात नाही. त्यावर कठडा बसवला जात नाही.

कठळ्या ची मागणी जेव्हा नागरिक करतात तेव्हा ही विहीर नगरपंचायत ला लागलेली नाही अशी उत्तरे मिळतात परंतु एकेकाळी नगरपंचायत नाही ती विहीर बांधून दिली याला काय म्हणावं?पाण्यासाठी नागरिकांचा ओरडा होतो तेव्हा पाईपलाईन जुनी आहे पाण्याचा साठा करायला आपण कमी पडतोय अशी वेगवेगळी प्रकारची उत्तरे दिली जातात आपल्याजवळ उपलब्ध असलेल्या पाण्याचे स्रोत मात्र दुर्लक्षित असतात म्हणून याकडे नगरपंचायत ने लक्ष दिले तर कारंजा ला पाणी कमी पडणार नाही.