पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या जयंतीदिनी परभणी ते चौंडी धावणार विशेष बसेस

25

🔹महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग विभागीय नियंत्रकांची माहिती

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.21मे):-पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनी 31 मे रोजी परभणी विभागातील प्रत्येक आगारातून विशेष बस धावणार असल्याची माहिती विभागीय नियंत्रक मुक्तेश्वर जोशी यांनी पत्राद्वारे दिली. सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या निवेदनानंतर महाराष्ट्रातला हा पहिलाच प्रयोग परभणीत राबविण्यात येत आहे.

चोंडी तालुका जामखेड जिल्हा नगर अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी 31 मे रोजी महाराष्ट्रातूनच नव्हे तर तमाम भारतभरातून लाखो अनुयायी ,अहिल्या प्रेमी अभिवादनासाठी जमतात. मिळेल त्या वाहनाने अहिल्याप्रेमी चौंडी येथे जात असले तरी परभणी लोकसभा मतदारसंघातील लहान बालके, अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांनाही सवलतीच्या दरात अहिल्यादेवींच्या अभिवादनासाठी जाता यावे यासाठी सखाराम बोबडे पडेगावकर, धनगर साम्राज्य सेनेचे प्रदेश संपर्कप्रमुख रविकांत हारकळ, युवा नेते राजकुमार दंडवते, विक्रम बाबा इंमडे यांच्या सामूहिक प्रयत्नातून दिलेल्या निवेदनानंतर बस सोडण्याचा निर्णय विभागीय नियंत्रकांनी घेतला.

विभागीय नियंत्रण जोशी यांनी नुकतेच सखाराम बोबडे पडेगावकर यांना पत्र पाठवून बसेस सोडणार असल्याची माहिती कळवली. आजपर्यंतच्या इतिहासात चौंडी येथे जाण्यासाठी बस सोडण्याचा हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग असणार आहे. 31 मे रोजी सकाळी सहा वाजल्यापासून जिल्ह्यातील परभणी, गंगाखेड ,सेलू जिंतूर ,पाथरी ,हिंगोली, कळमनुरी, वसमत ,परतूर ,मंठा ,घनसावंगी आगारातून बसेस धावणार आहेत. बसच्या संखेला कसलीही मर्यादा असनार नसून जितके जास्त प्रवासी उपलब्ध होतील तेवढी बसेसची संख्या वाढवणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. एकूणच अहिल्या प्रेमींनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन नारायणराव धनवटे यांनी केले आहे.