सिरसाळ्यात हाॅटेल जळूण खाक

26

🔺गॅस टाकीचाही झाला स्फोट

🔺भीषण आगीने सिरसाळ्यात खळबळ

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)

सिरसाळा(दि.21मे):-येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील तेलगाव रोड लगत असलेल्या कृष्णा नामक चहा नाश्ता हाॅटेल ला दुपारी १ : ३० वाजता च्या दरम्यान आग लागली. आग एवढी प्रंचड होती कि, सर्व हाॅटेल जळूण खाक झाले आहे.

हाॅटेल मधील गॅस च्या टाकीचा देखील स्फोट झाला, स्फोटा मुळे तर आग अधिकच भडकली, आगीचे/धुराचे लोळ हवेत पसरले होते, आगीचे कारण समजले नाही .स्थानिक नागरिकांनी पाणी उपलब्ध करुन आग अटोक्यात आणल्याचे वृत्त आहे.