जुगनाळा सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी विनोद सहारे तर उपाध्यक्षपदी रत्नाकर दोनाडकर यांची बिनविरोध निवड

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.21मे):-तालुक्यातील जुगनाळा येथील सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत सर्व 13 ही उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. निवडणुकीत होणारा पैशाचा अपव्यय टाळण्यासाठी व संस्थेची आर्थिक परिस्थिती बघता बिनविरोध निवडणूक करण्यासाठी माजी जि. प. सदस्य प्रमोदभाऊ चिमुरकर व गोपालजी शालीकराम ठाकरे उपसरपंच जुगनाळा यांनी पुढाकार घेतला होता. जुगनाळा सेवा सहकारी संस्था 13 सदस्यीय असून या संस्थेत जुगनाळा, मागली, जवराबोडी मेंढा, आकापुर, रुपाळा, गर्वला या गावांचा समावेश आहे. जुगनाळा सेवा सहकारी संस्थेची एकूण सभासद संख्या 399 आहे.माजी जि. प. सदस्य प्रमोदभाऊ चिमुरकर व गोपालजी शालीकराम ठाकरे उपसरपंच जुगनाळा यांच्या मार्गदर्शनाखाली दि.20/05/2022 रोज शुक्रवारला अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवडणूक बिनविरोध पार पडली.

यात अध्यक्षपदी विनोदजी श्रावण सहारे तर उपाध्यक्षपदी रत्नाकरजी लक्ष्मण दोनाडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर सदस्य म्हणून मन्सारामजी राजीराम मुळे, प्रभाकरजी वासुदेव तोंडरे, कुसनजी मुह्रारी टेंभूर्ने, नानाजी भिकाजी राखडे, आनंदरावजी मुकुंदा ढोरे, विवेकानंदजी कवळुजी थेरकर, लक्ष्मणजी हरबाजी पानसे, पुंडलीकजी केशव थेरकर, वासुदेवजी नथ्थु चंडीकार, लिलाबाई शामराव ठाकरे, प्रमिलाबाई विठोबा ठाकरे यांचा समावेश आहे.सर्व नवनियुक्त अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालकांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी प्रमोदभाऊ चिमुरकर माजी जि.प.सदस्य, गोपालजी ठाकरे उपसरपंच, लक्ष्मीबाई लालाजी सहारे सरपंच जुगनाळा, उमेशजी धोटे सरपंच चौगान, देविदासजी कार साहेब, सुरेशजी चौधरी, प्रकाशभाऊ लिचळे, गिरीधरजी ठाकरे, अन्नाजी ठाकरे, केवळरामजी बगमारे, खामदेवजी दोनाडकर, खुशालजी तोंडरे, हरीदासजी मुळे, विनायकजी तोंडरे, अरुणजी ठाकरे ,मधुकरजी ढोरे तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामवाशी यांची यावेळी उपस्थिती होती.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, विदर्भ, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED