ओबीसी सुतार समाजात किती टक्के जागृती आहे?

28

ओबीसी समाजाच्या वेगवेगळ्या जातीत किती टक्के सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कला क्रीडा,कामगार आणि राजकीय क्षेत्रात जागृती आहे. यांचा तपास करण्याचे काम मी गेली वर्षभर करीत आहे. किती टक्के सुतार समाज बांधवांना सुतार सामाजिक क्षेत्रातील विविध विषय समजतात. डिसेंबर 2020 पासुन मी जिथं जाईल तिथे सुतार समाजात मग एखादा घरगुती कार्यक्रम असेल, भेटीगाठी घेण्यासाठी लग्नसमारंभ असेल किंवा अन्य कोणत्याही निमित्ताने मी जिथं जिथं जाईल तिथं तिथं अशा वेळी त्या त्या ठिकाणी मी एक सामाजिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला समाजाशी निगडित मुद्दा हाती घेतला आहे.

अर्थात सुतार समाजात किती टक्के समाज बांधवांना सामाजिक क्षेत्रातील माहिती समजते आणि माहिती आहे. त्यात तालुक्या,जिल्ह्यातील सुतार समाजातील सामाजिक, राजकीय नेत्यांचे नांव व पक्ष, कामगार क्षेत्रातील नेत्यांचे नांव आणि संघटना, युनियन,शिक्षण क्षेत्रातील शिक्षक, प्राध्यापकांचे नांव, संघटना, ओबीसी सुतार समाजात डॉक्टर,वकील किती आहेत.पोलीस प्रशासनात पोलीस अधिकारी,ए सी पी, डी सी पी, किती आहेत.ओबीसी सुतार समाज हा कुशल कारागीर असून तो असंघटीत कामगार म्हणून त्यांची सरकारच्या कामगार विभागात नांव नोंदणी आहे काय?.त्यासाठी समाजातील कोण नेता,कार्यकर्ता काम करतो. समाजातील गरीब व तळागाळातील उपेक्षित खेड्यातील सुतार समाज बांधवांना राज्य व केंद्र सरकारच्या कल्याणकारी,समाज विकासाच्या योजनांची माहिती आणि अनेक सामाजिक विषयी किती माहिती समाज बांधवांना आहे.असे विचारत असतो तेव्हा समाज बाधंव नुसता तोंडाकडे पाहत राहतो. उच्चशिक्षण घेतलेल्या शिक्षणात, नोकरीत ओबीसी आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या सुशिक्षित लोकांना ही माहिती नसेल तर माझ्या सारखा भंगारचा धंदा करणारा समाज बांधव कोणत्याच गुणवंतेच्या जनगणनेत बसणार नाही.

दुसरी माहिती सामाजिक,शैक्षणिक संस्कृती, कला क्रिडा,कामगार या क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्या बद्दल सामाजिक नेता, कार्यकर्ता, कलाकार, कुशल कारागीर दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले विविध प्रकारचे सामाजिक पुरस्कार तालुख्या,जिल्ह्यातील सुतार समाजाला कधी व किती मिळाल्याची माहिती आहे काय? समाजात वावरताना अनेक ठिकाणी जाऊन अनेक गोष्टी आहेत की,त्यांना वरील विषयी माहिती समाज बांधवांना किती टक्के आहे,ही माहिती गोळा केली की समजते आपण व आपला ओबीसी सुतार समाज किती जागृत आहे.सुतार सामाजिक क्षेत्रातील विविध सामाजिक विषय ओबीसी सुतार समाजाच्या सामाजिक नेता माहिती नसतील तर ओबीसी सुतार समाजाला सामाजिक पुरस्कार कसे काय मिळतील. सर्वांगीण सामाजिक विकास,सामाजिक दुष्ट्या समाज स्वावलंबी करणे,इत्यादी विषयी खऱ्या अर्थाने समाजात समाज जागरूकता झाली पाहिजे.विशेष करून व्यवसाय व रोजगाराच्या बाबतीत समाजात वावरताना समाज जागरूक असला तर मागणी करता येते.

मी मार्शल सुतार ग्रुपवर अनेक वेळा सामाजिक विषयावर लिखाण केले आहे. त्या त्या विषयावर माहिती घेण्याचा प्रयत्न करीत आहे आणि एक प्रकारे एक सामाजिक सर्वे सुरू केला आहे. त्याला काही समाज बांधवानी सहकार्य केले तर काहींनी अतिशहाणा रिकामचोट म्हणून उल्लेख केला.त्याचे मला बिलकुल वाईट वाटले नाही. कारण माझ्या कडे जे देण्या सारखे आहे ते मी ओबीसी समाजाला नियमितपणे देत राहतो. ज्यांच्या कडे जे देण्यासारखे आहे ते तेच देणार. ओबीसी सुतार समाजात जमिनीवर समाजकार्य करावे लागेल. केवळ सोशल मीडियावर करून समाज परिवर्तन होणार नाही.यांची जाणीव ठेवावी लागेल. अर्थात मी ते ठेऊनच भंगारचा धंदा करून लिहणे फिरणे संपर्कातून मैत्रीभावना वाढविण्याचे काम करतो.
ओबीसी सुतार समाजात समाज नेतृत्व या शब्दाचा वापर कटाक्षाने टाळला जातो. सुतार समाजात स्वयंघोषित नेतेगिरी करणारे खूप आहेत. सामाजिक परिवर्तन नक्कीच मार्शल सुतार विचारधारा आत्मसात करणारा सुतार समाजातील सर्वसामान्य समाज बांधव हळुहळु ओबीसी सुतार सामाजिक क्षेत्रातील समाज नेतेगिरी या स्वनिर्मित शब्दाला आपल्या पासुन हळुवारपणे अलगद करण्याची समाज मानसिकता तयार करू शकेल. म्हणजे खऱ्या अर्थाने चिकित्सक पध्दतीचा अवलंब करण्यासाठी मानसिकता तयार होऊ शकते. बदल नक्कीच होईल. परिवर्तनास भलेही काही कालावधी लागेल.मित्रांनो फक्त सर्वसामान्य समाज बांधव नव्हे तर पूर्वीचे आपल्या नावासोबत नेतृत्व हि सामाजिक दृष्टीने अत्यंत महत्वाची आणी जबाबदारी युक्त सामाजिक सन्मानजनक बिरुदावली जोडली गेली असेल तर त्यामध्ये सुद्धा सामाजिक, वैचारिक नैतिकतेच्या आधारे नक्कीच परिवर्तन होईल आणी नेतृत्व या शब्दाचा वापर कटाक्षाने जोडला जाईल.काम केले तर नांव होईल.

अन्यता तुमच्याकडे सोने, चांदी, गाडी बंगला, जमीन जुमला संपती किती आहे त्याला समाजात काही किंमत नाही.आणि नसते.हे डोळ्यासमोर ठेवून मी समाजात मैत्रीभावना वाढविण्याचे काम करीत आहे. त्यामुळेच ओबीसी सुतार समाजात शत्रू भावना कमी होऊन प्रेम आपुलकी जिव्हाळा निर्माण होत आहे अशी मला खात्री होत आहे. समाज जागृती अभियान अंतर्गत सामाजिक क्षेत्रातील सामाजिक विषयाला वैयक्तिक पातळीवर महत्व दिले जात नाही हा छोटासा पॉईंट लक्षात घेणे गरजेचा आहे. व्यक्ती पेक्षा समाज मोठा आहे समाजा पेक्षा विचारधारा मोठी असते. तोच अभाव ओबीसी सुतार समाजात आहे.तो वैचारिक बदल घडविणे हाच माझा संकल्प आहे.

सुतार समाजात नेतृत्व एक गौडबंगाल किंवा उतावीळपणा सुद्धा आहे,त्याला काही अपवादात्मक आहेत.साधारण एक वर्षापुर्वी सुतार समाजात वावरताना सामाजिक नेता, सामाजिक नेतृत्व अमुक अमुक नेता इत्यादी सामाजिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानाचे सन्मानजनक शब्द बातम्या लेख वाचायला ऐकायला मिळत असत.चांगले कार्य केल्यास भविष्यात असे शब्द ऐकण्यासाठी सर्वांनी तयार असले पाहिजे.समाजातील मान्यवर एकमेकांना मागे पुढे खेचण्याचा प्रयत्न करु शकतात स्वतः मात्र कोणीही मला सन्मान द्या मी या पात्रतेचा आहे.मी छान समाजकार्य करतो मला नेता नेतृत्व म्हणुन स्वीकार करावा असं कोणीही म्हणण्यास पुढाकार घेणार नाही. त्याचे एकमेव सामाजिक कारण म्हणजे फक्त आणी फक्त नको मानपान,नको मोठेपणा,नको नाव, नको गाजावाजा, नको प्रसिद्धी यालाच जास्त महत्व दिल्यामुळे समाजात संघटना बांधणी व्यवस्थितपणे होत नाही. सनदशीर मार्गाने नोंदणी कृत समाजाची संघटना असावी.तरच आपण अधिकाराने न्याय,हक्क,सन्मान अधिकार मागू शकतो.त्यासाठी ओबीसी सुतार समाजात किती टक्के जागृती आहे?.यांची माहिती असणे अतिआवश्यक आहे.त्यासाठी मला सहकार्य करा नव्हे समाजाला ओबीसी सुतार समाजाला संघटीत करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे ही ओबीसी सुतार समाजाकडून अपेक्षा करतो.चुकीचे असेल तर हक्काने सांगा.सूचना करा,संवाद साधा,चर्चा करा.हीच हात जोडून नम्र विनंती.

जय संत भोजलिंग,जय संविधान, जय ओबीसी, जयभिम!

✒️प्रमोद सूर्यवंशी(चिखली,मातृतीर्थ बुलडाणा)मो:-8605569521