भु-वैकुंठ आत्मानुसंधाण अड्याळ टेकडी येथे जिवन शिक्षण शिबिराचे समारोप

38

✒️संजय बागडे(नागभीड,तालुका प्रतिनिधी)मो:-9689865954

नागभीड(दि.21मे):- श्री गुरुदेव आत्मानुसंधान भु -वैकुंठ अड्याळ टेकडीवर दरवर्षी दि ५ ते २० मे या कालावधीत जीवन शिक्षण शिबिराचे आयोजन केले जातात.भूवैकुंठ आत्मानुसंधान अड्याळ टेकडी येथील तत्वज्ञान चे मार्गदर्शक व संचालक आदरणीय श्री सुबोधदादा यांच्या मार्गदर्शनाखाली १५ दिवस चाललेल्या जीवन शिक्षण शिबिरात अध्ययन, व्यायाम व उद्योग आधी विषयांचे जीवनोपयोगी धडे देण्यात आले. ध्यान, भजन, ग्रामगीता, अध्ययन *राष्ट्रसंत तुकडोजी महाराज , गीताचार्य तुकारामजी दादा यांचा* जीवन परिचय, श्रमदान, आदर्श दिनचर्या, आहारशास्त्र, निसर्गोपचार आणि आयुर्वेद योगा, क्रीडा व लघुउद्योगांची माहिती देण्यात आली, मंजन, अमृतधारा, आसन, पत्रावळी बनविणे, चटई, धुपबत्ती, चरखा, कपडा विणाई आधी विविध विषय प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगण्यात आले.

डॉ.नवलाजी मुळे, सुश्री रेखाताई बुराडे, सुश्री गंगाताई काकडे , अक्षय कुळे ,यांनी विद्यार्थ्यांना विविध विषयांचे ज्ञान दिले. गीताचार्य तुकारामजी दादा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सहवासाने पावन झालेल्या अड्याळ टेकडी निसर्गरम्य वातावरणात हे जिवण शिक्षण शिबिर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमाला आदरनिय संचालक सुबोधदादा, गडचिरोली येथील गुरुदेव सेवा मंडळाचे जेष्ठ कार्यकर्त आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले डॉ.कुभारे साहेब, डॉ.धनलाल शेंन्द्रे नागपुर, डॉ.माळवे, डॉ. लुंगे सर डाॅ.नवलाजी मुळे गुरूजी ,शांतीदास लुंगे.सौ.स्नेहलता आई,सुश्री रेखाताई महिला प्रमुख,* व इतर अड्याळ टेकडी समर्पित सदस्य उपस्थित होते.या शिबिरात दहा जिल्ह्यांतील 200 विध्यार्थी सहभाग घेतले होते.यावेळी शिबिरार्थींनी विविध प्रात्यक्षिके सादर केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारानुसार आदर्श समाज घडविण्यासाठी टेकडीवर विविध उपक्रम वर्षभर आयोजित करण्याची परंपरा यापुढेही राहणार आहे.असे आवाहन संचालक आदरणीय सुबोधदादा केले.