सिरसाळ्यात खुलेआम गुटखा विक्री- पोलिसांची बघ्यांची भुमीका

✒️अतुल बडे(सिरसाळा प्रतिनिधी)

परळी(दि.21मे):-तालुक्यातील सिरसाळा गावात परिसरातील खेडे गावात गटखा विक्रीने थैमान घातले, पहावे तेथे गुटखा विक्री राजरोस पणे सुरु आहे. गुटखा माफिया दरोज गुटख्याचा पुरवठा खुले आम करत आहे आणि टपरी चालक, हाॅटेल मालक, किरणा दुकादार बिनधास्त गुटखा विक्री करत आहेत. सिरसाळा पोलिसांना मात्र याचे भान/ गांभीर्य असल्याचे दिसत नाही. एकही कार्य वाही गुटख्यावरती झाल्याचे दिसुन येत नाही. सिरसाळा पोलिस स्टेशन पासुन हाकेच्या अंतरावर अनेक दुकान, टप-या मधून गुटखा विक्री होतो आहे. पोलिस कर्मचारी, अधिकारी मात्र शिक्षकी पेशा असल्यासारखे गपगुमाने निघून जातात.

मोहा रोड, तेलगाव रोड, परळी रोड, पोहनेर रोड, सोनपेठ रोड, जुने बसस्थानक परिसर या ठिकाणच्या किराणा दुकान ,टपरी हाॅटेल मधून गुटखा विक्री केला जातो. एका दुकानातून दरोज तीन चार पुढे विक्री होतात तर सिरसाळा व परिसरातील खेडे गावातील दुकानातून किती मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होत असेल असा प्रश्न निर्माण होतो आहे . यावरुन असे समजते कि दरोज लाखो रुपयांची उलाढाल गुटखा धंद्यातून होते आहे. गुटखा माफिया पोत्या मध्ये गुटख्याच्या पुढ्याचे पोते बांधून प्रत्येक दुकान/ टपरी चालक यांना पार्सल करतो. सिरसाळा पोलिस प्रशासनाने अथवा बीड पोलिस प्रशासनाने याकडे लक्ष देऊन कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामस्था मधून होत आहे.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED