पेनुर जवळ भीषण अपघात सहा ठार; तीन जखमी, मोहोळच्या खान कुटुंबावर काळाचा घाला

✒️नानासाहेब ननवरे(कुरुल,प्रतिनिधी)मो:-9922358308

कुरुल(दि.22मे):-मोहोळ तालुक्यातील पेनुर जवळ युनोव्हा व स्कार्पीओ यांचा भीषण अपघात होऊन पती पत्नी डॉक्टरसह त्याची एक मुलगी मयत डॉक्टराच्या नात्यातील अन्य पती पत्नी व त्यांचा मुलगा अशा एकूण सहा जण जागीच मृत झाल्याची घटना घडली पेनुर जवळ ता.मोहोळ .22 मे रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली . याबाबत अधिक माहिती अशी की मोहोळ येथील मागील तीन पिढयापासुन वैद्यकिय व्यवसायामध्ये असलेल्या खान कुटुंबियातील डॉ .अफरीन खान ( आतार ) ( वय 30 ) त्यांचे पती मुजाहीद ईमाम आतार ( वय 35 ) मुलगा अरमान मुजाहीद आतार ( वय 5 ) , यांचेसह डॉ . अफरीन खान ( आतार ) यांचे भाऊ नातेवाईक कुंटबिय कौंटुबिक कारणानिमीत्त स्वताच्या सॅलोरा ( गाडी नं M. H. 13 DT 8701 या गाडीने बाहेरगावी गेले होते .

आज रविवार रोजी परत ते आपल्या मोहोळ गावी परत येत असताना पेनुरजवळील माळी पाटीजवळ मोहोळहुन पंढरपूरकडे निघालेल्या स्कॉपीओ ( गाडी नं . M.H.13 .D.E.1242 ) या गाडीने समोरासमोर जोराची धडक दिल्याने कारमधील डॉ . अफरीन खान ( वय 30 ) त्यांचे पती मुजाहीद आतार त्याचा मुलगा अरमान यांचेसह ईरफ रखाँ खान त्यांची पत्नी बेनझीर ईरफान खान मुलगी अनायाई खान असे ६ जण जागीच ठार झाले . तर इतर ४ जण गंभीर जखमी असुन त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे . अनिल हुंडेकरी ( वय 35 ) मनीषा मोहोन हुंडेकरी ( वय 30 ) रा . गादेगांव ता.पंढरपूर अरहान ईरफान खान ( आतार वय 10 ) रा . मोहोळ आदीजखमींना पुढील उपचारासाठी सोलापूरला हलविण्यात आले आहे . अपघाताची माहीती पोलीस घेत असुन पुढील कार्यवाही सुरू आहे .

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED