🔸चिमूर तालुका ऑटो-टॅक्सी चालक मालक कामगार संघटनची मागणी

✒️चिमूर (पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(दि.30 जून)- कोविड19 च्या संकट काळात ऑटो-टॅक्सी चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे, त्यामुळे महाराष्ट्र शासनाने त्यांना लाकडाऊन सुरू झाल्यापासून दरमहा 5 हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्यात यावे व ऑटो चालकांचे घरगुती वीज बिल माफ करण्यात यावे,या मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना सादर करण्यात आले.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नावाने सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,संपुर्ण देशात कोरोना आजारामुळे दिनांक 24 मार्च 2020 पासून लाकडाऊन सुरू आहे,त्यामुळे ऑटो व टॅक्सी व्यवसाय पूर्णतः बंद आहे,या व्यवसायात काम करणाऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे,त्यामुळे कुटूंबाचे पालनपोषण करणे कठीण झाले आहे.
देशात लाकडाऊन सुरु असल्यामुळे दिल्ली शासनाने ऑटो चालकांना दरमहा 5 हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला, याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात यावा व या व्यवसायातील कामगारांचे घरगुती वीज बिल माफ करण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
निवेदन सादर करताना संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली कमलाकर बोरकर, प्रशांत रामटेके, राकेश पंधरे,रुपेश कोलते, रोशन साठोने, प्रमोद नागपुरे,अशोक वाघमारे, अमोल भिलकर,मूनाफ पठाण, धनराज डांगे आदी उपस्थित होते.

चंद्रपूर, रोजगार

©️ALL RIGHT RESERVED