बीड जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन जिल्हाध्यक्षपदी डॉ. अजय दादा धोंडे यांची निवड

40

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.23मे):-महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशन संलग्न असलेल्या बीड जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी डॉ. अजय दादा धोंडे यांच्यासह उपाध्यक्षपदी अविशांत कुमकर, सचिवपदी विशाल बोकेफोड तर खजिनदार म्हणून आवेज सय्यद यांची निवड करण्यात आली आहे.

देशभरात टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून क्रिकेटचा प्रसार प्रचार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनचे राज्यभरात जोमाने काम सुरू आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मिनाक्षी गिरी यांच्या मार्गदर्शनानुसार बीड जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या बीड जिल्हाध्यक्षपदी डॉ. अजय भीमराव धोंडे यांची निवड करण्यात आली आहे.

आष्टी येथील मा. आ. धोंडे यांच्या निवासस्थानी सोमवार दिनांक २३ मे रोजी सकाळी १० वाजता आयोजित केलेल्या बैठकीत नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. बीड जिल्हा कार्यकारिणीमध्ये बीड जिल्हा जिल्हाध्यक्षपदी डॉ. अजय दादा धोंडे यांच्यासह जिल्हा सचिव विशाल बोकेफोड, जिल्हा उपाध्यक्ष अविशांत कुमकर व खजिनदार आवेज सय्यद यांचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी प्रा. मुस्ताक पानसरे यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.