रक्तविर सेनेमार्फ़त ग्रामसेवक सपाटे यांनी 44 वां रक्तदान केला पूर्ण

34

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.23 मे):- ब्रम्हपुरी शहरात विक्रोळ उन्हाळ्याचे दिवस आणि वेगवेगळ्या आजारने ग्रस्त असलेले रुग्ण उपचारासाठी येत आहेत.अशातच रक्ताची गरज सुद्धा जास्त प्रमाणात वाढत चाललेली आहे.

रुग्णाच्या मदतीला दिवस-रात्र असो की उन्हाळा-पावसाळा-हिवाळा त्याचा सामना करण्याची हिम्मत फक्त रक्तविर करु शकतो. हे आजच्या विक्रोळ उन्हाळ्याच्या दिवसात दिसून येत आहे.12 महिन्याच्या चिमुकला स्नेहल शिवरकार डांबेविरली आजाराने ग्रस्त होता. अशात रक्ताची गरज भासली व धावपड सुरु झाली.ग्रामसेवक देवेंद्र सपाटे यांना रक्तविर सेनेच्या ग्रुपवरून माहिती मिळाली असता वेळ-काळ न बघता तुरंत भर उन्हाणात 44 वां रक्तदान पूर्ण करुण चिमुकल्यासाठी जीवनदाता ठरले.

रक्तविर सेना अध्यक्ष निहाल ढोरे यांनी रक्तविर ग्रामसेवक सपाटे यांचे आभार मानले व 44व्या रक्तदानाबद्द्ल अभिनंदन केले. व प्रत्येक सरकारी व गैर सरकारी सेवकांनी स्वतःला रक्तविर समजून या समाजकार्याच्या क्षेत्रात नवी क्रांति घड़विण्यास आपले तन-मन-धनाने सहकार्य करावे,असा संदेशहि दिला.

या कार्यात रक्तविर सेना उपाध्यक्ष मायासिंग बावरी, स्वप्निल राऊत,प्रज्वल जनबंधू,सूरज ठवरे, प्रणय ठाकरे,वैभव तलमले,सतीश दर्वे,रुपम शिवुरकार,मंगेश कोल्हे,रोहित राऊत,पवन बेदरे,सूरज तूपट,शरद नाकाड़े,हर्षल फाये,प्रदिप दर्वे,सत्यपाल गोठे,संदिप कामडी व अनेक गावातील रक्तविरांचे मोलाचे सहकार्य होते.