नागभीड येथील सन 1927 सालची ब्रिटिश कालीन कौलारू वर्ग खोलीचे दुरुस्तीची मागणी – अध्यक्ष शाळा व्यव्थापन समिती नागभीड

47

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

नागभीड(दि.23मे): – नागभीड येथील जिल्हा परिषद प्राथमिक बेसिक शाळा मुलांची येथील ब्रिटिश कालीन इमातीचे बांधकाम सन 1927पासून अस्तित्वात असून ईमारत आजच्या स्थितीत जशीच्या तशी असून इंग्रजांनी देखावा ठेवला आहे पण सर्व इमारत कौलारू असून सहा वर्गखोली दुरुस्ती करणे जरुरीचे असल्यामुळे गेल्या तीन वर्षापासून शाळा व्यवस्थापन समितीने अनेक वेळा पंचायत समिती नागभीड व जिल्हा परिषद चंद्रपूर कडे दुरुस्ती बाबत पाठपुरावा केला असून चिमूर श्रेंत्राचे आमदार महोदयांनी यांना सुध्दा जावक क्रमांक 314/2020 दिनांक 21 जुलै 2020 ला निवेदन दिले आहे. आजच्या स्थितीत वर्ग खोल्या कौलारू असल्यामुळे बंदराच्या त्रासामुळे कवेलू व फाटे फुटलेले,कुजले, असून ईमारत पावसामुळे गळत आहे.

चालू सत्रात जवळपास 100 मुले असुन कोठे बसावे असा प्रश्न उभा शाळा समोर ऊभा आहे . इमारतीचे कवेलू काढून टिन टाकने , प्लास्टर पुटिंग करणे , रंगरंगोटी करणे, खिळल्या दरवाजे दुरुस्ती करणे, इतर कामे करण्या बाबत सप्टेंबर 2021-2022 वर्षात जिल्हा परिषद बांधकामाचे इस्टिमेंट रुपये 4205700 बेचाळीस लाख पाच हजार सातशे रुपये असुन सदर इटिमेंट फाईल जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी चंद्रपूर यांच्या कडे फाईल धुर खात पडलेली आहे. सदर कामे जनहिताचे नसुन शालेय मुलांच्या जीवाशी निगडित उज्वल भविष्याकडे वाटचाल करणारे असुन या बाबिकडे लक्ष केंद्रित करून समंधीत गाव प्रेमीनी पाठपुरावा करावे, व ईमारत दुरुस्ती करून द्यावे या शाळेत सन 1928 पासुनचा पुराणा शाळेत शिकणारे व्यक्तिचा रेकॉर्ड, दस्तावेज आहे,असे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तसेच पत्रकार संघाचे सचिव श्री अरुण रामुजी भोले ,शाळेचे उपाध्यक्ष सौ रुपाली भास्कर उईके .सर्वश्री नथूजी येसंसुरे , अनिल सेलोकर, सौ संगीता रामटेके सौ. सीमा पातेवर , सौ सपना खोब्रागडे इत्यादी सदस्यांनी एका प्रसिद्ध वृत्तपत्रा द्वारे कळविले आहे.