मोर्शी वरुड तालुक्यातील रस्ते विकासकामांसाठी ३ कोटीं ७४ लक्ष रुपयांचा निधी मंजूर !

65

🔸मोर्शी वरुड तालुल्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची होणार दुरुस्ती !

🔹आमदार देवेंद्र भुयार यांची मतदार संघाच्या विकासाकडे वाटचाल !

✒️मोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मोर्शी(दि.23मे):- विधानसभा मतदार संघातील महत्वाच्या रस्त्यांच्या नूतनीकरण व दुरुस्ती करण्यासाठी लेखाशीर्ष माडा मिनीमाडा ३०५४-०३६३/०४०७ अंतर्गत ग्रामीण रस्त्यांचा विकास पूल, स्लॅब ड्रेन व माजबुती करणाच्या रस्त्यांच्या कामासाठी ३ कोटी ७४ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार देवेंद्र भुयार यांनी दिली .मोर्शी विधानसभा मतदार संघातील विविध मार्गावर खड्डे पडल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो त्यामुळे या गावातील नागरिक, शेतकरी, व्यावसायिक तसेच शालेय विद्यार्थ्यांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत होते. या रस्त्यांची कामे व्हावीत अशी नागरिकांची मागणी होती. या मागणीची दखल घेत देवेंद्र भुयार यांनी रस्त्यांच्या नूतनीकरणासाठी निधी मिळावा यासाठी पाठपुरावा सुरु केला होता. त्या पाठपुराव्याला यश मिळून या रस्त्यांच्या दुरुस्ती पूल, स्लॅब ड्रेन व नूतनीकरणासाठी तब्बल ३ कोटी ७४ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

मोर्शी वरुड तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्तीचा प्रस्ताव आमदार देवेंद्र भुयार यांनी सादर केल्यामुळे वरुड मोर्शी तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्तीच्या मागणीची दखल घेऊन माडा मिनीमाडा ३०५४-०३६३/०४०७ अंतर्गत ग्रामीण रस्त्याचा विकास पूल, स्लॅब ड्रेन व मजबुतीकरणाच्या कामाकरिता ३ कोटी ७४ लक्ष रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली आहे.

आमदार देवेंद्र भुयार यांनी ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्तीचा प्रस्ताव सादर करून वारंवार पाठपुरावा करून मोर्शी वरुड तालुक्यातील रस्त्यांची झालेली दुरावस्था गांभीर्याने लक्षात आणून दिली. याची तातडीने दखल घेऊन रस्त्यांच्या कामासाठी ३ कोटी ७४ लक्ष रुपयांची मंजुरी दिली असून मोर्शी वरुड तालुक्यातील डोंगर यावली घोडदेव रस्त्याची सुधारणा करणे ३० लक्ष रुपये, भिवकुंडी पाळा रस्त्याची सुधारणा करणे ४० लक्ष रुपये, उराड ते लोहदरा रस्त्यावरील संरक्षक भिंतीचे बांधकाम करणे २०लक्ष रुपये, उराड ते लोहदरा रस्त्याची सुधारणा करणे २४ लक्ष रुपये, बेलखेड ते खानापूर रस्ता सुधारणा करणे १० लक्ष रुपये, धानोरा ते भिवकुंडी रस्त्याची सुधारणा करणे १० लक्ष रुपये, चिंचोली गवळी ते भिवकुंडी रस्त्याची सुधारणा करणे १० लक्ष रुपये, मलकापूर ते चिंचोली गवळी रस्त्याची सुधारणा करणे १० लक्ष रुपये, चारुड इंदूर बेलखेडा ते सुपाळा रेल्वे स्टेशन रस्ता सुधारणा करणे १० लक्ष रुपये, दाहसुर पिंपरी रस्त्याच्या बाजूला पिंपरी येथे नालीचे बांधकाम करणे १० लक्ष रुपये, तरोडा चिंचोली गवळी रस्त्यावरील पुलाचे बांधकाम करणे १० लक्ष रुपये, मालिमपूर रसुलपूर बेलखेडा रस्त्याची सुधारणा करणे १० लक्ष रुपये, चिंचोली गवळी धानोरा रस्त्याची सुधारणा करणे १० लक्ष रुपये, टेंभुरखेडा ते शहापूर रस्त्याची सुधारणा करणे १० लक्ष रुपये, खडका ते बारगाव रस्त्याची सुधारणा करणे १० लक्ष रुपये, कार्ली वाई खुर्द रस्त्याची सुधारणा करणे १० लक्ष रुपये, खापरखेडा ते पंढरी रस्त्याची सुधारणा करणे १० लक्ष रुपये, खेडी पोहच रस्त्याची सुधारणा करणे १० लक्ष रुपये, कुंभिखेडा भांडोली सुरळी रस्त्याची सुधारणा करणे १० लक्ष रुपये, शेकदारी ते झटामझीरी रस्त्यावरील पुलाचे बांधकाम करणे १० लक्ष रुपये, कार्ली वाई खुर्द मार्गावरील स्लॅब ड्रेन बांधकाम करणे १० लक्ष रुपये, इसंबरी ते शहापूर मार्गावरील स्लॅब ड्रेन बांधकाम करणे १० लक्ष रुपये, महेंद्री ते खापरखेडा मार्गावरील स्लॅब ड्रेन बांधकाम करणे १० लक्ष रुपये, उराड ते तरोडी मार्गावरील स्लॅब ड्रेन बांधकाम करणे १० लक्ष रुपये, इसंबरी ते वरुड मार्गावरील स्लॅब ड्रेन बांधकाम करणे १० लक्ष रुपये, सुरळी ते मुसलखेडा मार्गावरील स्लॅब ड्रेन बांधकाम करणे १० लक्ष रुपये, चांदस ते शेकापूर मार्गावरील स्लॅब ड्रेन बांधकाम करणे १० लक्ष रुपये, पुसली ते सातनूर रस्त्याची सुधारणे करणे १० लक्ष रुपये, केकतवाडा पोहच मार्ग रस्त्याची सुधारणा करणे १० लक्ष रुपये, वाई पोहच मार्ग रस्त्याची सुधारणा करणे १० लक्ष रुपये, या सर्व विकास कामांसाठी ३ कोटी ७४ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या विकास कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे मोर्शी वरुड तालुक्यातील नागरिकांनी आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार व्यक्त केले.