व्यक्तीचे पूर्ण जीवन सांगणारे जागतिक कॅलेंडर

  56

  ✒️प्रतिनिधी पंढरपूर(अमोल कुलकर्णी)

  पंढरपूर(दि.24मे):-प्रत्येक व्यक्ती जन्माला येताना एक वेळ असते की जी पुढे जन्म कुंडली,पत्रिका म्हणून वापरली जाते.जगात सर्वच देशात धर्म,अध्यात्म आणि विज्ञानात ही खगोलशास्त्र अभ्यासले जात आहे.अंतराळ,परग्रहवासी,गूढ विद्या अशा अनेक गोष्टींचा कुतूहल म्हणून जगातील प्रत्येक माणूस अभ्यास करत असतो.

  भूतकाळ,वर्तमानकाळ भविष्य,याबाबत जाणून घेण्याचे प्रत्येकाला कुतूहल असते.अनेक ज्योतिष शास्त्र विशारद देखील विज्ञानाचा वापर ही आता भविष्य जाणून घेण्यासाठी करू लागले आहेत.त्यासाठी काही टाईम मशीन बनवून काळाच्या पुढे मागे जाण्याच्या प्रयत्नात आहेत.तर काही समांतर जगाच्या,पाताळ योनीच्या शोधात आहेत.
  पण यासाठी महत्वाचे असते ते कालमापन वेळ,दिवस,तारीख,वार असे काही अंग दर्शवणारे अनेक कॅलेंडर आपण आजवर पाहिली आहेत.पुढे काही विषयवार कॅलेंडर ही निर्माण होऊ लागले.उदा.कृषी कालनिर्णय, खगोलकाल दर्शिका,सहकार काल दर्शिका असे अनेक प्रकार तयार झाले.पण जर माणूस आणि त्याचे सर्वच व्यक्तिगत जीवन भूतकाळ,वर्तमान आणि पुढील हजारो वर्षे जीवन याचे खोलवर अभ्यासपूर्ण सत्य माहिती उलघडून दाखवणारे जर कॅलेंडर समोर आलं तर आपण काय म्हणाल?

  चकित झालात ना ?तर होय असे कॅलेंडर मुंबईतील एका नामांकित बायो केमिकल अभियंत्याकडे आहे.जगातील कोणत्याही व्यक्तीची पूर्ण माहिती सांगणारे हे कॅलेंडर उर्दू फारशी भाषेत सहा भागात गुंफलेले आहे.याचा धातू पितळी असून ते सन 1400 मध्ये बनवले असल्याचे समोर आलं आहे.या तबकड्या वर लिहिलेल्या भाषेतून कोणत्याही व्यक्तीच्या अनेक प्रश्नांची उकल होऊ शकते असे या अभियंत्यांचे म्हणणे आहे.या वस्तूची पूर्ण माहिती देऊन सदर वस्तू आंतरराष्ट्रीय लिलावात देण्यासाठी इंग्लंड येथील एका व्यावसायिकाने तब्बल तीन हजार कोटी रुपयांची बोली लावण्याचा शब्द दिला आहे.

  परंतु वस्तू भारतात रहावी यासाठी त्यांनी ती ऑफर नाकारल्याचे समजते.स्वतःसाठी खूप जगलो पण आता उर्वरित आयुष्यात मला काश्मीरी पंडित यांच्या साठी पूर्ण देशातून हिंदू लोक सहकुटुंब काश्मीर खोऱ्यात वसवायचे आहेत असे त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.त्यासाठी तिकडील सर्व घरे,जमिनी,साहित्य,मासिक जगण्यासाठी लागणारी रक्कम देऊन किमान 5000 कुटुंबे वसवण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली.ही सुरुवात महाराष्ट्र मधून करायची आहे याबाबत केंद्र सरकार यांच्याशी बोलून कार्यपद्धती वापरली जाणार आहे.तरुणाना जमिनी,तसेच रोजगारही तिथे उपलब्ध करून दिला जाणार आहे.

  सदर कॅलेंडर ची माहितीचे वाचन,विवेचन करणारी व्यक्ती भेटल्यास पूर्ण जगाचा एक मोठा विषय समोर येऊन आगामी सर्व घटना दिसून येणार असल्याने त्या गूढ कॅलेंडर ची सर्वत्र चर्चा आहे.

  कॅलेंडर चे सुटे भाग आणि त्यावर लिहिलेले उर्दू फारशी संकेत विषय..
  छायाचित्रे:-अमोल कुलकर्णी पंढरपूर