शेतकरी व जनतेच्या प्रश्नावर राज्य सरकार व केंद्र सरकार तसेच सत्तेत असणारे विरोधक यांचे पोटात बेइमानी – सुनील ठोसर प्रदेश सरचिटणीस

34

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

गेवराई(दि.24मे):-तालुक्यातील मौजे हिंगणगाव येथील शेतकरी नामदेव जाधव यांनी खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून व अनेक नेते कार्यकर्ते, कारखानदार यांचेकडे चकरा मारल्या व कोणीही लक्ष्य देत नाहीत व स्वतः शेतातील लिंबाच्या झाडाला आत्महत्या केली आज अनेक विविध लोक या प्रश्नावर आपली राजकीय पोळी भाजून गेले कोणी आपल्या परीने मदत केली पण नामदेव जाधव यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत व शेतकरी कुटुंबाचे राज्य सरकारच्या व केंद्र सरकारच्या तसेच दोन्ही सरकारच्या सत्ता नसल्यामुळे ओरडणाऱ्या विरोधकांच्या चुकीच्या धोरणामुळे नामदेव जाधव सारख्या कष्ट करी शेतकऱ्यांचा सह राज्यात अनेक ठिकाणी शेतकरी आत्महत्या केल्याची वृत्त तसेच बीड जिल्ह्यात नामदेव जाधव यांच्या नंतर अजूनही आत्महत्या झाल्या आहेत.

यातच राज्याचे सामाजिक न्याय मंत्री विविध ठिकाणी मोठमोठाल्या सभा घेऊन राष्ट्रवादी आपल्या दारी असे गोडबंगाल पिटत आहेत हे सामाजिक न्याय खात्याला कलंक आहे पीडित कुटुंबाला तबियत ठीक नाही असे कारण दाखवत वेळ काढू पणा करत असताना यातच राष्ट्रवादी आपल्या दरी यावेजी राष्ट्रवादीचा राज्यात दारुण प्रभाव अशी वेळ येणाऱ्या निवडणुकीत आल्याशिवाय राहणार नाही राज्याचे मुख्यमंत्री,पालक मंत्री,विभागीय आयुक्त,सहकार मंत्री आदी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करूनही सदरील कुटुंबाला न्याय मिळत नसल्यास आम्ही आज रयत शेतकरी संघटनेच्या माध्यमातून माननीय तहसीलदार साहेब तहसील कार्यालय, गेवराई याशी आंदोलक * शेतकरी तथा रयत शेतकरी संघटना,पदाधिकारी,मौजे हिंगणगाव येथील गोदावरी नदीच्या पात्रात जलसमाधी आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

तरी तालुक्यातील शेतकरी,शेतमजूर,रोजगार आदी संघटना सहभागी होऊन मुर्दाड शासनाला सामान्य माणसाच्या व शेतकरी प्रश्नावर लक्ष्य वेधण्यासाठी आपण सामूहिक जलसमाधी आंदोलन गोदावरी नदीच्या पात्रात दिनांक २६/०५/२०२२ रोजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे याची सर्वोतोपरी माहिती रीतसर मुख्यमंत्री,गृहमंत्री,पालकमंत्री,आयुक्त,जिल्हाधिकारी,मामलेदार,प्रांत, पोलिस निरीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस अधीक्षक, राज्याचे गृहमंत्री आदी सर्वांना दिलेली आहे हे सर्व सत्तेत गुंतलेले महाशय शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहेत का हे पाहण्यासाठी शासकीय व प्रशासकीय यंत्रणा फक्त गुत्तेदार व माफिया पोसण्यात गुतले असून मौजे हिंगणगाव तालुका गेवराई जिल्हा बीड येथील कै. नामदेव जाधव यांनी स्वतःचा ऊस कारखान्याला जात नाही म्हणून तो पेटवून दिला व स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली सदर नामदेव जाधव यांच्या कुटुंबाला शासनाकडून दहा लाख रुपये आर्थिक मदत मिळावी खाजगी सावकार यांचेवर कायदेशीर कार्यवाही व्हावी तसेच त्याच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला शासकीय सेवेमध्ये घ्यावे.

आत्महत्या कुटुंबाला सर्व शासकीय योजना विना अट लागू करण्यासाठी म्हणून शासनाचे लक्ष जाधव कुटुंबाकडे वेधण्यासाठी आम्ही रयत शेतकरी संघटनेच्या वतीने नदीच्या पात्रामध्ये उभे राहून जलसमाधी आंदोलन करणार आहोत तरी सदर आंदोलनास रयत शेतकरी संघटना पदाधिकारी, विविध संघटना, सामाजिक कार्यकर्त्या, कार्यकर्ते,शेतकरी सहभागी होत आहेत आपण प्रशासनाच्या वतीने सर्व मागण्या मंजूर करून सदरील शेतकरी कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी रयत शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आपल्याकडे विनंतीपुर्वक करण्यात येत आहे मागण्या मान्य केल्या नाही तर आंदोलनाची जबाबदारी प्रशासनावर राहील संस्थापक अध्यक्ष साहेब,विभागीय आयुक्त साहेब,पोलिस अधीक्षक साहेब उपविभागीय पो.अधिकारी साहेब पोलिस निरीक्षक तथा रयत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब उर्फ रवीप्रकाश देशमुख प्रदेश अध्यक्ष मारोतराव मगर, महिला प्रदेशाध्यक्ष नयना गवळी, प्रदेश कार्याध्यक्ष तय्यब पटेल, सुनीता ताई जाधव, प्रदेश उपाध्यक्ष वैजयंता ताई हरेल, राज्य प्रवक्त्या अंजली ताई म्हात्रे, अजय महाराज, रेखा ताई माळी, हेमंत कुलकर्णी, अरुण खुंटे प्रदेश सल्लागार, राज्य संपर्क प्रमुख रामदास कोतवाल, प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर, शेतकरी, सर्व जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख तथा सर्व पदाधिकारी य करणार असा रयत शेतकरी संघटना वतीने सुनील ठोसर पाटील यांनी दिलेला आहे