अखेर प्रशासनाच्या आश्र्वासनाने भाजपाचे उपोषण मागे

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

गडचांदूर(दि.25मे):-शहर भाजपच्या वतीने दलित आघाडी अध्यक्ष प्रशांत खाडे आणि बबलू रासेकर हे मागील सात दिवसांपासून नगरपरिषद प्रशासनाच्या अन्यायकारक कारभाराविरोधात नगरपरिषदेपुढे ठिय्या आंदोलन देत आमरण उपोषणाला बसले होते.शहरी पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांच्या घरकुलाचा रोखलेला निधी त्वरित देणे आणि मालमत्ता करावरील व पाणीपट्टी कर थकबाकी धारकांवर लावलेली अतिरिक्त ०२ टक्के रक्कम रद्द करणे या मागण्यांसाठी हे आमरण उपोषण सूरू होते.

आज उपोषणकर्ते प्रशांत खाडे आणि बबलू रासेकर या दोघांनाही निंबू सरबत पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली.उपोषणकर्त्यांच्या दोन्ही मागण्या रास्त होत्या. परवा दिवशी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे आंदोलनस्थळी येऊन गेले असता सदरहू मागण्या तातडीने पुर्ण करण्यासंदर्भात मा. जिल्हाधिकारी व नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांचेशी चर्चा करून विनंती केली.त्यानुसार आज त्या मागण्यांना नगरपरिषद प्रशासनाकडून हिरवा कंदील दाखविल्याने उपोषणकर्त्यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले.जनतेच्या हितासाठी जनकल्याणाची भावना घेऊन भाजपचा कार्यकर्ता हा नेहमीच तत्पर असतो. आणि त्यापूढे प्रशासनाला देखील नमते घ्यावे लागते. हे आज गडचांदूरकरांना प्रशांत खाडे आणि बबलू रासेकर यांच्या रूपाने अनुभवायला मिळाले.

यावेळी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे माजी आमदार संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, शहर अध्यक्ष सतीश उपलेंचीवार, माजी नगराध्यक्षा सौ. विजयालक्ष्मीताई डोहे, नगरसेवक अरविंद डोहे, रामसेवक मोरे, निलेश ताजने, महेश शर्मा, जिवती तालुकाध्यक्ष केशव गिरमाजी, जिल्हा आघाडीचे सुरेश केंद्रे, भाजयुमो महामंत्री महेश देवकते, हरीश घोरे संदीप शेरकी,गणपत बुरटकर, राकेश अरोरा, अशोक दरेकर, दीपक गुरनुले, प्रशांत खाडे, बबलू रासेकर, प्रतीक सदनपवार, मेहताब सर, अजीम बेग, इम्रान पाशा, सौ रंजनाताई मडावी, सौ विनाताई खंडाळकर, सत्यदेव शर्मा, तुषार देवकर, गंगाधर खंडाळे, हफिजभाई, महेश घरोटे यांचेसह शहरातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED